Breaking : bolt
बीडचे जिल्हा हिवताप अधिकारी 89 लाखाच्या अतिरिक्त उचल प्रकरणी निलंबित..!डॉ.नागेश लखमावार, डॉ.संजयकुमार पांचाळ यांच्यावर निलंबनाची कारवाई !“निधी मंजूर, तरी लाभार्थी वंचित ! सिंधुदुर्ग आरोग्य विभागाच्या कारभारावर मायकल डिसोझांचा घणाघाती हल्लाबोल !”“एका महान सुपुत्राची चिता अजून धगधगतेय… आणि सत्तेच्या लोकार्पणाची दिवाळी उजळतेय ! १८ ऑगस्टनंतर पुन्हा दौरा, मग ९ ऑगस्टची घाई कशाला..?”सावंतवाडीच्या इतिहासाचे काटे थांबले, प्रशासनाची वेळ कधी येणार ?“मंत्री - अधिकाऱ्यांची नावे पत्रिकेत झळकली… सिव्हिल सर्जन मात्र गायब !”साताऱ्यातील वाईच्या रुग्णालयात औषध की विषाचा डोस..?"ज्याने तुमच्या घरातील तीन पिढ्या सांभाळल्या... त्या डॉक्टरला तुम्ही एका झगमगत्या बोर्डासाठी विसरलात का..?"काळालाही हरवणारा शिक्षणमहर्षी...! पद्मश्री डॉ.डी. वाय.पाटील यांना 'निर्भीड पोलीस टाइम्स'ची कृतज्ञ आदरांजली"प्रश्न विचारणाऱ्यांवरच हल्ला ? आधी पत्रकारांची बदनामी, आता मंत्र्यांच्या नावाने अफवा पसरवल्याचा दावा..?"

जाहिरात

 

सिंधुदुर्गमध्ये अंमली पदार्थांविरोधात संयुक्त कारवाईचे निर्देश

schedule31 Mar 26 person by visibility 403 categoryसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग प्रतिनिधी - जिल्ह्यात अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन होण्याचे दृष्टीने सर्व विभागांनी पोलीस विभागासोबत एकत्रितरित्या कामकाज करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी, मच्छिंद्र सुकटे यांनी सुचना दिल्या. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेली अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक, सेवन याबाबत गोपनिय बातमिदारांमार्फत माहिती काढून असे करत असलेल्या व्यक्तिविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे N-CORD संदर्भातील मासिक बैठक निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिद्र सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन उपस्थित होते.

              तसेच अशाप्रकारचे बेकादेशीर कृत्य करणाऱ्यांवर प्रतिबंध करणेसाठी, शाळा / कॉलेज व इतर शैक्षणिक संस्थांचे परिसरात अंमली पदार्थांचे सेवन, विक्री होत असल्यास त्यादृष्टीने कारवाई करण्यासाठी संबधीत विभागांना आदेशीत केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुख्यत्त्वे लगतचे गोवा राज्य आहे. त्या राज्यातून शिरोडा, वेळागर याठिकाणी परदेशी नागरीक मोटार सायकल किंवा बोटीद्वारे प्रवास करीत असतात. त्यांचेकडुन अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री व सेवन होत आहे. त्यामुळे त्यादृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व विभागांनी मिळून जनजागृती अभियान हाती घेवुन अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणण्याबाबत सूचना श्री. सुकटे यांनी दिल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes