Breaking : bolt
सुनेत्रा पवार यांच्या निवडीची पहिली इच्छा व्यक्त करणारे नरहरी झिरवाळ यांचा एसीपीचा ट्रॅप आणि आत्ताचा व्हीडीओ काढून मिडियाला देणारा झारीतले शुक्राचार्य कोण ?आमदार राहुल आवाडे यांचे आमदार सतेज पाटील यांच्याबद्दलचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे - संजय पोवारदिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्यनिमेस्युलाईडचं प्रमाण १०० ग्रॅमहून अधिक असणाऱ्या औषधांवर बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजनमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रमआचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा – प्रशासक के. मंजूलक्ष्मीमाजी आरोग्यमंत्र्यांना नडलेल्या अधिकाऱ्याची लाचेसाठी मध्यस्थामार्फत लावलेली सेटिंग लाचलुचपतने उधळलीघसादुखी, टॉन्सिलदुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपायअपुऱ्या पायाभूत सुविधेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर, स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याचे कारण पुढे करत माय-लेकांच्या पार्थिवाची हेळसांड

जाहिरात

 

दररोज उपयोगात येणारे घरगुती उपाय

schedule02 Jan 26 person by visibility 29 categoryआयुर्वेद

बाळासाहेब पाटील (संपूर्ण जीवन फार्मा.प्रा.लि.)

डोकेदुखी-  डोके दुखत असल्यास १ चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून अर्ध्या मिनिटाने ग्लासभर पाणी प्यावे. डोकेदुखी लगेच थांबते.

अर्धशिशी (मायग्रेन) - रात्री कच्चा पेरु उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा. सकाळी हा लेप धुवून टाकावा. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो.

पूर्ण डोके दुखणे - निर्गुडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा. तो स्वच्छ हाताने चुरगाळून त्याच्या रसाचे १-२ थेंब नाकात सोडावेत आणि डोके मागे करुन अर्धा तास झोपावे.

सायनस - सुंठ आणि गूळ समप्रमाणात उगाळावे. त्यात अर्धा चमचा पाणी घालून ते कोमट होईपर्यंत गरम करावे. वस्त्रगाळ करुन प्रत्येकी अर्धा चमचा दोन्ही नाकपुड्यात सोडावे. डोके मागे करुन अर्धा तास झोपावे. त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा हाच प्रयोग करणे.

केसगळती - घाणीवरील खोबरेल तेल (ब्रॅण्डेड नको) पाव लिटर, तुळशीची २ पाने, जास्वंदाच्या झाडाची २ पाने (फुलाची नव्हे), १ चमचा ब्राह्मी पावडर, १ चमचा आवळा पावडर आणि मधमाश्यांच्या पोळ्याचे मेण (मेणबत्तीचे नव्हे) १५ ते २० ग्रॅम्स एकत्र करुन मंद आचेवर शिजवावे. त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर (काळे होऊ देऊ नये) ते गाळून घ्यावे. ह्या तेलाने रोज रात्री १० मिनिटे केसांच्या मुळांना मालिश करावे. सुरुवातीला सलग आठ दिवस हा प्रयोग रोज करावा. स्त्रियांनी पुढील दोन महिन्यांपर्यंत आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करावा. पुरुषांनी रोज करायला हरकत नाही. स्नान करताना स्त्रियांनी कोमट पाण्याने आणि पुरुषांनी थंड पाण्याने आंघोळ करावी.

डोळ्यांसाठी - नागवेलीचे (विड्याचे) पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून, स्वच्छ हाताने चुरगाळावे व त्याचा रसाचा एक-एक थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडावेत. रोज हा प्रयोग केल्यास दृष्टी चांगली राहते, आयुष्यभर चष्मा लागत नाही, काचबिंदू / मोतीबिंदू इत्यादी नेत्ररोग होत नाहीत.

नाकातील हाड वाढल्यास - ५ रिठे व १ चमचा सुंठ पावडर ३ कप पाण्यात अर्धा कप पाणी होईपर्यंत उकळावे. नंतर हे पाणी वस्त्रगाळ करुन घ्यावे. कोमट झाल्यानंतर ते काचेच्या स्वच्छ बाटलीत भरुन ठेवावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात त्याचे २-२ थेंब सोडावेत. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास नाकातील वाढलेले हाड कायमस्वरुपी पूर्ववत होते.

सर्दीचा त्रास झाल्यास - दोन्ही हाताचे अंगठे मुठीत ठेवून त्या मुठी विरुद्ध हाताच्या काखेमध्ये २ मिनिटे दाबून ठेवल्यास सर्दीचा त्रास कमी होतो.

वजन कमी करण्यासाठी - ताजे ताक घुसळून त्यातील लोणी काढून टाकावे व १ लिटर ताकात २ लिटर पाणी या प्रमाणात हे ताक एक दिवसाआड रोज प्यावे.

हृदय मजबूत होण्यासाठी - रोज सकाळी नियमितपणे लसणाची एक पाकळी खावी. हृदयरोग्याने २ पाकळ्या खाव्यात. यामुळे ब्लॉकेजेस निघून जातात.

कफ वाढल्यास किंवा दम लागत असल्यास - कांदा किसून त्याचा रस काढावा. हा रस कापडातून गाळून घ्यावा व एक मोठा चमचा भरुन प्यावा. त्यानंतर अर्ध्या मिनिटाने गरम पाणी प्यावे. यामुळे १० मिनिटात सर्व कफ निघून जातो, श्वास मोकळा होतो, ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो व दम लागत नाही.

लहान मुलांच्या सर्दी व कफासाठी - अर्धा चमचा मोहरी कुटून त्यात १ थेंब मध घालावा व त्याचा वास द्यावा. कफ मोकळा होऊन सर्दी जाते.

अपचनाचा त्रास - रोज एक वेलदोडा (वेलची) घेऊन त्यातील काळे दाणे अर्ध्या-एक तासाने एक-एक तोंडात टाकून चघळून खावेत.

हार्ट ॲटॅक आल्यास - लगेच १ चमचाभर तुळशीच्या पानांचा रस प्यावा. त्यानंतर १-२ मिनिटांनी बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे व उरलेला रस पिऊन टाकावा. यामुळे ५ मिनिटात हार्ट ॲटॅक निघून जातो.

अपचनाचा त्रास - बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. यामुळे ५ मिनिटात करपट ढेकर थांबते व अपचनाचा त्रास नाहीसा होतो.

पोटाचा घेर (लठ्ठपणा) कमी करण्यासाठी - रोज जेवल्यानंतर बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. चमचा जिरे व ओवा (यामध्ये थोडीशी बडीशेप घातल्यास चालेल)चावून कोमट पाण्याबरोबर गिळणे. सकाळी व दुपारी समान प्रमाणात आहार घ्यावा. म्हणजे सकाळी २ पोळ्या खाल्ल्यास दुपारी सुद्धा २ पोळ्या खाव्यात. मात्र रात्री त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे १ पोळी खावी. जेवल्यानंतर कोणत्याही थंड पदार्थाचे (उदा. आईस्क्री म, सरबत वगैरे) सेवन करु नये.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes