Breaking : bolt
सुनेत्रा पवार यांच्या निवडीची पहिली इच्छा व्यक्त करणारे नरहरी झिरवाळ यांचा एसीपीचा ट्रॅप आणि आत्ताचा व्हीडीओ काढून मिडियाला देणारा झारीतले शुक्राचार्य कोण ?आमदार राहुल आवाडे यांचे आमदार सतेज पाटील यांच्याबद्दलचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे - संजय पोवारदिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्यनिमेस्युलाईडचं प्रमाण १०० ग्रॅमहून अधिक असणाऱ्या औषधांवर बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजनमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रमआचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा – प्रशासक के. मंजूलक्ष्मीमाजी आरोग्यमंत्र्यांना नडलेल्या अधिकाऱ्याची लाचेसाठी मध्यस्थामार्फत लावलेली सेटिंग लाचलुचपतने उधळलीघसादुखी, टॉन्सिलदुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपायअपुऱ्या पायाभूत सुविधेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर, स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याचे कारण पुढे करत माय-लेकांच्या पार्थिवाची हेळसांड

जाहिरात

 

मिरज सिव्हील येथील खुनाच्या गुन्हयातील संशयितांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या संशयितांकडून चार कोयते व दोन दुचाकी वाहने जप्त

schedule15 Nov 25 person by visibility 123 categoryक्राइम न्यूजसांगली

संजय तोडकर (सांगली) -  १२ नोव्हेंबर रोजी मिरज शहर पोलीस ठाणे कडील दाखल गुन्हयातील अटकेतील संशयितांना शासकीय वाहनातुन वैद्यकीय तपासणी करीता सिव्हील हॉस्पीटल मिरज येथे घेवून गेले होते. नमुद संशयितांची ओपीडी विभागात वैद्यकीय तपासणी सुरु असताना ओपीडी समोर रेकॉर्ड वरील संशयित वंश वाली हा संशयीतपणे फिरताना आढळला होता. त्यास गावठी बनावटीचे पिस्तुल व लोंखडी कोयत्यासह ताब्यात घेतले होते. त्याचे विरुध्द महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज गु.र.नं. २९१ / २०२५ भारतीय हत्यार प्रतिबंधक अधिनियम कलम ३, ४, २५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) / १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयाचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील पोउनि संदीप गुरव हे करीत आहेत.

                सदर गुन्हयाचे तपासामध्ये वंश वाली व त्याचे साथीदार अक्षय फोंडे, वैभव आवळे, समर्थ पोतदार, समर्थ गायकवाड यांचा सहभाग असलेचे निष्पन्न झालेने त्यांचे शोधाकरीता पाठविलेले पथकाने संशयितांना गुन्हा दाखल झाले पसुन अवघ्या ४ तासात अटक केली होती. सदर अटक संशयितांना मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायलयाने त्यांची दिनांक १५ नोव्हेंबर रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली. पोलीस कोठडी मुदतीत अटक संशयितांकडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्यांनी गुन्हा घडलेनंतर घटनास्थळावरुन पलायन केल्यानंतर लपवुन ठेवलेली गुन्हयातील घातक हत्यारे कोठे ठेवली याबाबत तपास करण्याच्या सुचना सपोनि संदीप शिंदे यांनी दिल्या होत्या. तपासामध्ये संशयितांनी गुन्हा करणेच्या उद्देशाने लपवुन ठेवलेली ०४ कोयत्या सारखी घातक हत्यारे तसेच मिरज सिव्हील हॉस्पीटल येथील गुन्हयात वापरलेली ०२ दुचाकी वाहने गुन्हयाचे तपासकामी जप्त केली आहेत. सदर गुन्हयामध्ये संशयितांकडे तसेच साक्षीदार यांचेकडे तपास केला असुन तपासाअंती निष्पन्न व मिळाले माहीतीचे आधारे वाढीव कलमांचा अंतर्भाव करुन सदर गुन्हयाचा पुढील तपास करणेबाबत सपोनि संदीप शिंदे यांनी तपासी अधिकारी यांना सुचना दिल्या आहेत. आगामी निवडणुक व कायदा सुव्यवस्था अनुषंगाने अवैध शस्त्र बाळगणारे व विक्री करणारे लोकांवर महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज कडून प्रभावी कारवाई करणेत येणार आहे. त्या अनुषंगाने कोणतीही उपयुक्त माहीती उपलब्ध असल्यास सदर माहीती देण्याचे अहवान जनतेस करणेत येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes