Breaking : bolt
“निधी मंजूर, तरी लाभार्थी वंचित ! सिंधुदुर्ग आरोग्य विभागाच्या कारभारावर मायकल डिसोझांचा घणाघाती हल्लाबोल !”“एका महान सुपुत्राची चिता अजून धगधगतेय… आणि सत्तेच्या लोकार्पणाची दिवाळी उजळतेय ! १८ ऑगस्टनंतर पुन्हा दौरा, मग ९ ऑगस्टची घाई कशाला..?”सावंतवाडीच्या इतिहासाचे काटे थांबले, प्रशासनाची वेळ कधी येणार ?“मंत्री - अधिकाऱ्यांची नावे पत्रिकेत झळकली… सिव्हिल सर्जन मात्र गायब !”साताऱ्यातील वाईच्या रुग्णालयात औषध की विषाचा डोस..?"ज्याने तुमच्या घरातील तीन पिढ्या सांभाळल्या... त्या डॉक्टरला तुम्ही एका झगमगत्या बोर्डासाठी विसरलात का..?"काळालाही हरवणारा शिक्षणमहर्षी...! पद्मश्री डॉ.डी. वाय.पाटील यांना 'निर्भीड पोलीस टाइम्स'ची कृतज्ञ आदरांजली"प्रश्न विचारणाऱ्यांवरच हल्ला ? आधी पत्रकारांची बदनामी, आता मंत्र्यांच्या नावाने अफवा पसरवल्याचा दावा..?"'पदे रिक्त... कारभार अतिरिक्त, महत्वाच्या पदावर कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करण्याऐवजी अतिरिक्त कार्यभाराची संस्कृती किती दिवस सुरु राहणार...?"औषधांशिवाय ग्रामीण रुग्णालये... नियोजनातील हलगर्जीपणाचा फटका रुग्णांना, वाढत्या जनआक्रोशासमोर आरोग्यमंत्र्यांची खरी परीक्षा..!"

जाहिरात

 

मित्रावरच गावठी पिस्टलने फायर करुन जखमी केलेल्या सराईत गुन्हेगारास व त्याचे साथीदारास अटक

schedule18 Nov 25 person by visibility 269 categoryक्राइम न्यूजसांगली

संजय तोडकर (सांगली) - दि.१७ नोव्हेंबर रोजी ०२.२० च्या सुमारास एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे हददीतील रेकॉर्डवरील संशयित राहुल माने, गणेश खोत व महेश पारछे हे सुतगिरणी चौक येथून राहूल माने याचे चारचाकी थार गाडी नं. एम. एच. १० ई. आर. ८२६२ या मधुन जात असताना राहुल माने व त्याचा साथीदार गणेश खोत या दोघांचा महेश पारछे याचेसोबत पैशाच्या देवान घेवानितून वाद झाला त्यावेळी गणेश सदाशिव खोत याने महेश पारछे यास लाथा बुक्यांनी मारहाण, शिवीगाळ करुन तुला आता जिवंत ठेवत नाही अशी दमदाटी धमकी दिली त्यावेळी राहुल सुभाष माने याने चिडून महेश पारछे याच्यावर त्याच्याकडील गावठी पिस्टलने महेश आनंद पारछे याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली असताना सदरची गोळी ही महेश पारछे याचे डाव्या मांडीला लागून तो गंभीर जखमी झाला त्यानंतर सदर घटनेची एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यास माहिती मिळताच सदर गंभीर घटनेच्या अनुषंगाने घटनास्थळी कुपवाड पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ धाव घेवुन भेट दिली. तसेच सदर गंभीर घटनेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक साो, सांगली, अपर पोलीस अधीक्षक साो सांगली, उपविभागीय पोलीस अधिकारी साो, मिरज विभाग यांना तात्काळ माहिती देवुन त्यांनी दिले सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी एमआयडीसी पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकास दोन टिम करुन संशयितांचा शोध घेण्याबाबत आदेशीत केले.

                 त्याप्रमाणे एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांनी तपासाची चक्रे गतीमान करुन सदर गुन्हयातील संशयित १) राहुल सुभाष माने, रा. संकल्पनगर, बामनोळी, कुपवाड, २) गणेश सदाशिव खोत, रा. शांत कॉलनी, कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली याना चार तासाचे आत ताब्यात घेतले आहे. तसेच गुन्हयात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्हयातील संशयित व जखमी रेकॉर्डवरील संशयित असुन त्यांचेवर खुन, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, यासारखे गंभिर गुन्हे दाखल आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes