Breaking : bolt
'Sterile' की 'Non-Sterile' ? जखमांवर उपचार की इन्फेक्शनचे आमंत्रण ? Gloves पुरवठ्यावर FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे तक्रार"पांढरा कोट दोषी नाही... दोषी आहे रिकाम्या खुर्च्यांचे सरकार..!"औषधांच्या बाटलीत विष कोण ओतत आहे ? सरकार जागे होणार की जनतेचा आक्रोश ऐकू येईपर्यंत झोपणार ?लोकशाहीचा विजय की अधिकारांच्या गैरवापराला न्यायालयाचा लगाम..?तडीपार कायद्याचा उद्देश गुन्हेगारी रोखणे, मतभेद दडपणे नव्हे..!घोषणाबाजी म्हणजे गुन्हा नव्हे, लोकशाहीचा श्वास गुदमरवणाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा ठोस इशारा..!शिवसेनेचे उद्याचे राजकारण, वारशाची लढाई, नेतृत्वाची परीक्षा आणि महाराष्ट्राच्या भविष्याचा प्रश्नफुटीनंतरचे नेतृत्व, बदलत्या महाराष्ट्रात जनसंपर्क, प्रशासन आणि विश्वासाची नवी परीक्षाशिवसेनेची ऐतिहासिक फूट, एका पक्षाची नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणाची निर्णायक वळणकथा"पांढरा कोट... विश्वासाची शान; जीव वाचविण्यातच डॉक्टरांची ओळख महान !"

जाहिरात

 

गरिबांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी मागितली लाच, बिडकीनमध्ये एसीबीचा 'ट्रॅप', बडा वैद्यकीय अधिकारी गजाआड

schedule07 Apr 26 person by visibility 352 categoryक्राइम न्यूजआरोग्य विभाग

सुशांत पोवार (छत्रपती संभाजीनगर) - शासकीय रुग्णालयात मोफत होणाऱ्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी १ हजार २०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बिडकीन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि कंत्राटी सफाई कर्मचारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले. याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदाराच्या बहिणीची कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात करायची होती. ही शस्त्रक्रिया शासकीय योजनेतून मोफत होणे अपेक्षित असताना येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय बजरंग दळवी यांनी ५ एप्रिल रोजी तक्रारदाराकडे ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शासकीय सेवा मोफत असताना लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ६ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.
         तक्रारीची पडताळणी केली असता, डॉ. दळवी यांनी शस्त्रक्रिया करून देण्यासाठी तडजोडीअंती १ हजार २०० रुपये लाच मागितल्याचे पंचासमक्ष निष्पन्न झाले. ही रक्कम त्यांनी रुग्णालयातील सफाई कामगार नारायण हरिश्चंद्र ब्राह्मणे याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी रुग्णालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून १ हजार २०० रुपये स्वीकारताच ब्राह्मणे याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मुख्य आरोपी डॉ. दळवी यांनाही पोलिसांनी झडप घालून अटक केली. कारवाईदरम्यान डॉ. दळवी यांच्याकडून एक मोबाइल, तर सफाई कामगार ब्राह्मणे याच्याकडून लाचेची रक्कम आणि मोबाइल जप्त करण्यात आला. सध्या आरोपींच्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक योगेश शिंदे, तपास अधिकारी संतोष तिगोटे, हवालदार इंगळे आणि युवराज हिवाळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes