Breaking : bolt
“निधी मंजूर, तरी लाभार्थी वंचित ! सिंधुदुर्ग आरोग्य विभागाच्या कारभारावर मायकल डिसोझांचा घणाघाती हल्लाबोल !”“एका महान सुपुत्राची चिता अजून धगधगतेय… आणि सत्तेच्या लोकार्पणाची दिवाळी उजळतेय ! १८ ऑगस्टनंतर पुन्हा दौरा, मग ९ ऑगस्टची घाई कशाला..?”सावंतवाडीच्या इतिहासाचे काटे थांबले, प्रशासनाची वेळ कधी येणार ?“मंत्री - अधिकाऱ्यांची नावे पत्रिकेत झळकली… सिव्हिल सर्जन मात्र गायब !”साताऱ्यातील वाईच्या रुग्णालयात औषध की विषाचा डोस..?"ज्याने तुमच्या घरातील तीन पिढ्या सांभाळल्या... त्या डॉक्टरला तुम्ही एका झगमगत्या बोर्डासाठी विसरलात का..?"काळालाही हरवणारा शिक्षणमहर्षी...! पद्मश्री डॉ.डी. वाय.पाटील यांना 'निर्भीड पोलीस टाइम्स'ची कृतज्ञ आदरांजली"प्रश्न विचारणाऱ्यांवरच हल्ला ? आधी पत्रकारांची बदनामी, आता मंत्र्यांच्या नावाने अफवा पसरवल्याचा दावा..?"'पदे रिक्त... कारभार अतिरिक्त, महत्वाच्या पदावर कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करण्याऐवजी अतिरिक्त कार्यभाराची संस्कृती किती दिवस सुरु राहणार...?"औषधांशिवाय ग्रामीण रुग्णालये... नियोजनातील हलगर्जीपणाचा फटका रुग्णांना, वाढत्या जनआक्रोशासमोर आरोग्यमंत्र्यांची खरी परीक्षा..!"

जाहिरात

 

बनावट औषध तयार करुन ते देशभर वितरीत करणाऱ्या वितरकांसह पुण्यातील औषध विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

schedule02 Jan 26 person by visibility 263 categoryक्राइम न्यूजआरोग्य विभाग

पुणे प्रतिनिधी - सिक्कीम येथील औषध कंपनीचे औषध बिहारमधील परवाने मुदतबाह्य झालेल्या वितरकाच्या नावाने ट्रिप्सिन या औषधाची बनावट निर्मिती करुन ते देशभर विकले जात असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने उघडकीस आणले आहे. अन्न व औषध प्रशासनाने पुण्यातील औषध विकत्यांसह ८ जणांवर गुन्हे दाखल करुन पुण्यातील मेडिकल दुकानातून २ लाख ७५ हजार रुपयांची बनावट औषधे जप्त केली आहेत.
             याबाबत औषध निरीक्षक श्रीकांत विश्वासराव पाटील (वय ३९) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अक्षय हसमुख पुनिया (अक्षय फार्मा, निंबाळकर तालीम चौक, सदाशिव पेठ), अमृत बस्तीमल जैन (आर्जस मेडिकल डिस्ट्रिब्युटर, साईस्पर्श अपार्टमेंट, सदाशिव पेठ), मनिष अमृत जैन (आर्जस मेडिकल डिस्ट्रिब्युटर, साईस्पर्श अपार्टमेंट, सदाशिव पेठ), रोहित पोपट नावडकर (रिद्धी फार्मा, तराटे कॉलनी, कर्वे रोड, एरंडवणे), देवेंद्र यादव (सिन्ना फार्मा, बी सी मेडिसिन मार्केट, नय्या गाव, पूर्व, लखनौ), उमंग अभय रस्तोगी,(रजा बाजार, रस्तोगी टोला चौक, लखनौ, उत्तर प्रदेश), महेश गर्ग (अमिनाबाद, लखनौ, उत्तर प्रदेश), सोनी महिवाल (महिवाल मेडिको, भोरे गोपालगंज, बिहार) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
             याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त गिरीष हुकरे यांनी माहिती दिली. अन्न व औषध प्रशासनाला सिक्कीम येथील टेरेंट फार्मास्युटिकल्स या कंपनीचे ट्रिप्सिन (trypsin chymotrypsin tablers (chymoral forte) या बनावट औषधाची पुणे शहरामध्ये विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याअनुषंगाने १६ ऑक्टोंबर २०२५ रोजी औषध निरीक्षकांनी सदाशिव पेठेतील अक्षय फार्मा या दुकानातून औषधाच्या साठ्यामधून चाचणी व विश्लेषणासाठी नमुना घेतला. हे औषध सिक्कीम येथील टेरेंट फार्मास्युटिकल्स या कंपनीकडे तुलनात्मक अभ्यासासाठी पाठविण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes