सुशांत पोवार (कोल्हापूर) - कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग गेले महिनाभर अनेक बातम्यांनी चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. औषध निर्माण अधिकारी युवराज बिल्ले तर देणगीतून आलेल्या औषध वितारणामध्ये असे बदनाम झाले की त्यातून मोठा गैरव्यवहार झाला की असेच वाचकांना वाटू लागले त्यामूळे ह्या प्रकरणाची सत्य आणि वस्तुनिष्ठता वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष वृत्तमालिका प्रकाशित करत आहोत......
जिल्हा परिषदेतील तत्कालीन भांडार विभाग प्रमुख औषध निर्माण अधिकारी युवराज बिल्ले यांनी कफ सिरप ची मागणी लक्षात घेऊन ज्या संस्थेकडून कफ सिरफ देणगी स्वरूपात घेतले त्या संस्थेने या व्यवहारात किती रुपयांचा व्यवहार केला ? कारण देणगी दिले तर व्यवहार नेमका कोणत्या स्वरूपात झाला आणि व्यवहार झाला नसेल तर भ्रष्टाचार नेमका किती रुपयांचा झाला ? तसेच आलेले कफ सिरपचे जार आवक जावक रजिस्टरला नोंदीत एकही जारची कमतरता नसेल आणि आले तितकेच प्राथमिक आरोग्य केंद्राला गेले तर औषध वितरणात अनियमितता कोणती झाली ? ह्याचे विश्लेषण केले तर असे लक्षात येते ज्या संस्थेने देणगी स्वरूपात कफ सिरपचे जार दिले त्यांना पोहोच स्वरूपात बॉटलमध्ये लेखी पोहोच दिल्याने सदर प्रकरण तापले परंतु ह्या आरोप प्रत्यारोपमुळे देणगीदार बदनाम होतोय त्याकडे कोण लक्ष देणार ? ह्या देणगीदारांनी जर आरोग्य विभागाकडे पाठ फिरवली तर नक्कीच औषधांचा तुटवठा जो भरून काढला जात होता तो भविष्यात न भरून येणारे नुकसान करू शकतो याकडे जिल्हा परिषद लक्ष देणार आहे का ? तसेच औषध निर्माण अधिकारी युवराज बिल्ले यांच्यावर कोरोना काळात झालेले आरोप आणि त्याची सत्यता याविषयीची मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली न्यायालयीन लढाई पाहिली असता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हेच पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना सत्य व वस्तुनिष्ठ माहिती देऊ शकतात परंतु ते न झाल्याने अनेक तर्क वितर्काना उधाण येऊन शेवटी बदनाम झाला तो आरोग्य विभाग, काम करणारे अधिकारी आणि देणगीदार पण हे वेळीच थांबले नाही आणि हे राजकारण करणाऱ्या व्यक्तीला वेळीच थांबविले नाही तर हे नुकसान कधीही न भरून येणारेच ठरेल....
क्रमशः
उद्याच्या वृत्तमालिकेत वाचा
प्रयोगशाळा साहित्य खरेदी टेंडरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट