Breaking : bolt
बनावट औषध पुरवठा प्रकरण बाहेर येऊ नये म्हणूनचंं तर झाले नसेल औषध निर्माण अधिकाऱ्याचंं निलंबन ?गणपती व आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील मानव गवंडी टोळी हद्दपारसंजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील सागर लोखंडे टोळी हद्दपार; सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात २ वर्षे प्रतिबंधितमुल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची फसवणूक, दागिने चोरी करणारा संशयित जेरबंदराष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपकोट्यवधींचा औषध खरेदी घोटाळा उजेडात, कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांची "आरोग्य भवन" वारी ?ठाकरे "ब्रँँड" ला धक्का पोहोचवणारा निकाल, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचा ठाकरे बंधूंना टोमणा !केंद्र सरकारची मुख्य निवडणूक आयुक्तांमुळे कोंडी होण्याची शक्यता, २४ तासात महाभियोग आणण्याची तयारी.....स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून कोकणात महायुतीतील बडे नेते राणे - सामंत यांच्यात तणाव.....?मागायला गेला "दाद" घातली कंबरेत "लाथ", लोकशाहीच्या आत्म्यावरचा प्रहार......

जाहिरात

 

बाळाचा मृतदेह पिशवीत घालून घरी नेण्याची वेळ, आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर

schedule16 Jun 25 person by visibility 222 categoryमहाराष्ट्र

आकाश भारतीय (विशेष वृत्त) - "नाशिकच्या डॉक्टरांनी ऑपरेशन करून बायकोला वाचवलं आणि माझं मेलेलं बाळ हातात दिलं. गाडीला पैसे नव्हते म्हणून ते बाळ परकरमध्ये गुंडाळलं, पिशवीत घातलं आणि एसटीने गावाकडं निघून आलो. कुणी गाडी विचारली नाही, कुणी मेलेल्या बाळाबद्दल चौकशी केली नाही. काहीच नाही..."मृत बाळाच्या वडिलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
               पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यात जोगलवाडी नावाचं एक गाव आहे. या गावात सखाराम आणि अविता कवर राहतात. प्रगत राज्य म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी ११ जूनच्या पहाटेपासून पुढचे दोन दिवस सखाराम आणि अविता यांच्यासोबत नेमकं काय घडलं हे जाणून घेतलंच पाहिजे. वीटभट्टीवर मजुरी करणारं हे कातकरी आदिवासी समाजाचं जोडपं त्यांच्या बाळाला जन्म देणार होतं. २६ वर्षांच्या अविता गर्भवती होत्या. ११ जूनच्या पहाटे अचानक त्यांच्या पोटात दुखायला लागलं. त्यानंतर घडलेला घटनाक्रम कुणाही संवेदनशील व्यक्तीला हादरवून सोडणारा आहे. आणि तेही मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरापासून शे-दोनशे किलोमीटरच्या अंतरावरील.
              पालघर जिल्ह्यातील कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू, पाणीटंचाई अशा समस्यांच्या दरवर्षी प्रकाशित होत असतात. मात्र, एवढी वर्षं या प्रश्नांचं वार्तांकन होऊनही या भागात काहीच बदललं नसल्याचं सध्या दिसून येतंय.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes