कोल्हापूरमध्ये वारंवार घडणाऱ्या दंगलीबाबत सर्वाच्या चौकशीची गरज
schedule17 Jul 24
person by
visibility 778
categoryइतर
सुदर्शन हजारे (कोल्हापूर) - विशाळगडवर झालेल्या हिंसचारानंतर शाहू महाराज यांनी मंगळवारी पाहणी केली. दुसरीकडे, कोल्हापूरमध्ये वारंवार घडणाऱ्या दंगलीबाबत सर्वांची चौकशी करण्याची गरज असल्याचे कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर अशांत करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी वरील वक्तव्य केले. पोलीस याबाबत गाफील राहिले का याची देखील चौकशी करू, असे त्यांनी सांगितले. आपल्याकडे जी माहिती होती ती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती आणि माध्यमांना सुद्धा सांगितल्याचे मुश्रीफ म्हणाले.