Breaking : bolt
बनावट औषध पुरवठा प्रकरण बाहेर येऊ नये म्हणूनचंं तर झाले नसेल औषध निर्माण अधिकाऱ्याचंं निलंबन ?गणपती व आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील मानव गवंडी टोळी हद्दपारसंजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील सागर लोखंडे टोळी हद्दपार; सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात २ वर्षे प्रतिबंधितमुल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची फसवणूक, दागिने चोरी करणारा संशयित जेरबंदराष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपकोट्यवधींचा औषध खरेदी घोटाळा उजेडात, कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांची "आरोग्य भवन" वारी ?ठाकरे "ब्रँँड" ला धक्का पोहोचवणारा निकाल, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचा ठाकरे बंधूंना टोमणा !केंद्र सरकारची मुख्य निवडणूक आयुक्तांमुळे कोंडी होण्याची शक्यता, २४ तासात महाभियोग आणण्याची तयारी.....स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून कोकणात महायुतीतील बडे नेते राणे - सामंत यांच्यात तणाव.....?मागायला गेला "दाद" घातली कंबरेत "लाथ", लोकशाहीच्या आत्म्यावरचा प्रहार......

जाहिरात

 

राष्ट्रीय समाज पक्षाकडून कोकण विभागामध्ये शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी 5 जिल्ह्यातील तहसीलदारांना निवेदन

schedule16 Jun 25 person by visibility 165 categoryराजकीय घडामोडी

रावजी तारी (सिंधुदुर्ग) - राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, वैभववाडी, मालवण, देवगड, कुडाळ, कणकवली तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर, गुहागर, चिपळूण, मंडणगड, दापोली, खेड येथील तहसीलदारांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनामार्फत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. शेतकरी हा देशाचा कणा असून, सततच्या नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ व बाजारातील मंदीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळावा यासाठी ही मागणी करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्ष नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचे हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करत राहील. असे पत्रकारांशी बोलताना कोकण विभाग अध्यक्ष सुशांत पोवार यांनी सांगितले. यावेळी कोकण महिला आघाडी अध्यक्षा सिमंतिनी मयेकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य भगवान ढेबे यांच्या अध्यक्षतेखाली पुढाकार घेतला.
       निवेदनामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड मोठ्या संकटाला सामोरे जात असताना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यापेक्षा शेतमजुराचे उत्पन्न जास्तीचे आहे. शेती करणे नुकसानीचे बनले आहे. अहवालानुसार दिवसाला आठ शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे. अशा काळात राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते की, आमचे सरकार आल्यास शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार आज हे धाडस दाखवण्याची वेळ आली आहे. आज तहसीलदारसो यांच्यामार्फत आम्ही शासनाला कळवीत आहे. शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी करत सातबारा कोरा करावा अशी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून मागणी करीत आहे याची नोंद शासनाने घ्यावी ,अन्यथा   लवकरच  तीव्र आंदोलन छेडले जाईल. असे नमूद केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes