युवराज खराडे (सातारा) - जिल्हा परिषद, सातारा येथे 26 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन आणि राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले, समाज कल्याण अधिकारी नितीन उबाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. यावेळी आपण व आपल्या आजूबाजूचा परिसर व्यसनमुक्त करणेसाठी कटीबध्द राहू, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी. श्री.घुले यांनी केले.