Breaking : bolt
बनावट औषध पुरवठा प्रकरण बाहेर येऊ नये म्हणूनचंं तर झाले नसेल औषध निर्माण अधिकाऱ्याचंं निलंबन ?गणपती व आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील मानव गवंडी टोळी हद्दपारसंजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील सागर लोखंडे टोळी हद्दपार; सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात २ वर्षे प्रतिबंधितमुल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची फसवणूक, दागिने चोरी करणारा संशयित जेरबंदराष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपकोट्यवधींचा औषध खरेदी घोटाळा उजेडात, कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांची "आरोग्य भवन" वारी ?ठाकरे "ब्रँँड" ला धक्का पोहोचवणारा निकाल, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचा ठाकरे बंधूंना टोमणा !केंद्र सरकारची मुख्य निवडणूक आयुक्तांमुळे कोंडी होण्याची शक्यता, २४ तासात महाभियोग आणण्याची तयारी.....स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून कोकणात महायुतीतील बडे नेते राणे - सामंत यांच्यात तणाव.....?मागायला गेला "दाद" घातली कंबरेत "लाथ", लोकशाहीच्या आत्म्यावरचा प्रहार......

जाहिरात

 

पुणे आरोग्य परिमंडळ उपसंचालक यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच अचानक बदलीने आरोग्य विभागात चर्चेला उधान !

schedule10 Jun 25 person by visibility 157 categoryमहाराष्ट्र

सुशांत पोवार (विशेष वृत्त) - डॉ.राधाकिसन पवार यांनी पुणे परिमंडळाच्या उपसंचालक पदाची सूत्रे नोव्हेंबर २०२२ रोजी हातात घेतल्यानंतर त्यांनी पुणे, सोलापुर, सातारा या तीनही जिल्ह्यांमधील आरोग्य यंत्रणेला शिस्त लावली. कामचुकार अधिकारी, कर्मचारी यांच्यावर त्यांनी कारवाई करत सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सातत्याने जाणीवपूर्वक प्रयत्न केले. इतकेच नव्हे तर नवीन रुग्णालयांची उभारणी, सुविधांमध्ये वाढ, शस्त्रक्रिया केंद्रांची उभारणी आणि सीसीटीव्हीद्वारे रुग्णालयीन सेवा नियंत्रण यामुळे नागरिकांना दर्जेदार सेवा मिळू लागल्या. इतकेच नव्हे तर, डॉ.पवार यांनी शहरातील बड्या खासगी रुग्णालयांमध्ये आढळलेल्या त्रुटींवर कारवाई करत त्यांच्या मनमानीला चाप लावला. नुकत्याच दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात कोणाच्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष अहवाल शासनाला सादर केला. डॉ.राधाकिसन पवार यांचा पुणे आरोग्य परिमंडळ उपसंचालक पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच अचानक कुष्ठरोग उपसंचालक पदी बदली झाल्याने आरोग्य विभागात चर्चा रंगल्या आहेत.

                      आषाढी वारी ९ ते १० दिवसांवर येऊन ठेपली आहे. या वारीमध्ये आरोग्य खात्याचा महत्त्वाची भूमिका असते. वारकऱ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यापासून त्यांना औषधोपचार व रोगराई, साथीचे आजार पसरू नये याचे नियोजन करावे लागते. ही वारी पुणे परिमंडळाच्या तीनही जिल्ह्यांतून जात असल्याने त्याचे नियोजन आरोग्य उपसंचालकांना करावे लागते. मात्र, बदली केल्याने त्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

डॉ.राधाकिशन पवार यांच्या कालावधीत झालेली कामे

१) पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत मिळून १३ ग्रामीण रुग्णालये, ६ उपजिल्हा रुग्णालये, ४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २ अपघात विभाग सुरू

२) बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या १.१८ कोटीवरून २.१८ कोटींवर, प्रयोगशाळा तपासण्या ८० लाखांवरून १.७२ कोटींपर्यंत वाढ

३) १३९ शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचे बांधकाम पूर्ण, पुणे जिल्ह्यातील १३ रुग्णालये सीसीटीव्हीद्वारे पुणे मंडळाशी जोडली.

४) गर्भधारणेसंबंधी सेवांमध्येही लक्षणीय वाढ २०२१-२२ साली २.८५ लाखांवरून २०२४-२५ मध्ये ३.१५ लाखावर

५) सिझेरियन प्रसूती २५ हजार ७५३ वरून ३६ हजार ३०६

६) रात्रीच्या वेळात करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया ७ हजार ७३७ वरून १० हजार ८२९

७) नवजात बालकांच्या तपासणीमध्ये दुपटीने वाढ

८) कर्करोग निदान व्हॅनद्वारे २१ लाखांहून अधिक तपासण्या; १४४ रुग्णांमध्ये कर्करोगाचे निदान

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes