सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले दोन दिवसांच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर
schedule29 Jan 25
person by
visibility 93
categoryलातूर
सचिन तळेकर (लातूर) - पालकमंत्री ना. भोसले यांचे ३० जानेवारी रोजी सकाळी लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. सकाळी ११.५५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथील जनसंपर्क कक्ष व संविधान उद्देशिका प्रतिकृतीचे त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात दुपारी १२ वाजता आयोजित लातूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित राहतील. दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे राखीव. दुपारी ३.३० वाजता हरंगुळ बु. येथील संवेदना प्रकल्प येथे ‘प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र’ उद्घाटन समारंभाला ते उपस्थित राहतील. त्यानंतर सोयीनुसार त्यांचे शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. सायंकाळी ७.१५ वाजता ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिर येथे त्यांचे आगमन होईल व दर्शन घेतील. सोयीनुसार लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व मुक्काम करतील.
३१ जानेवारी रोजी सकाळी १०.१५ वाजता लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे ‘भरोसा सेल’ इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री ना. भोसले यांच्या हस्ते होईल. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १०.४० वाजता आयोजित विविध जिल्हास्तरीय समित्यांच्या बैठकीला ते उपस्थित राहतील. सकाळी ११.४५ वाजता त्याचे शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. दुपारी २.४० वाजता लातूर विमानतळ येथून हेलिकॉप्टरने पुणेकडे प्रयाण करतील.