Breaking : bolt
बनावट औषध पुरवठा प्रकरण बाहेर येऊ नये म्हणूनचंं तर झाले नसेल औषध निर्माण अधिकाऱ्याचंं निलंबन ?गणपती व आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील मानव गवंडी टोळी हद्दपारसंजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील सागर लोखंडे टोळी हद्दपार; सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात २ वर्षे प्रतिबंधितमुल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची फसवणूक, दागिने चोरी करणारा संशयित जेरबंदराष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपकोट्यवधींचा औषध खरेदी घोटाळा उजेडात, कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांची "आरोग्य भवन" वारी ?ठाकरे "ब्रँँड" ला धक्का पोहोचवणारा निकाल, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचा ठाकरे बंधूंना टोमणा !केंद्र सरकारची मुख्य निवडणूक आयुक्तांमुळे कोंडी होण्याची शक्यता, २४ तासात महाभियोग आणण्याची तयारी.....स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून कोकणात महायुतीतील बडे नेते राणे - सामंत यांच्यात तणाव.....?मागायला गेला "दाद" घातली कंबरेत "लाथ", लोकशाहीच्या आत्म्यावरचा प्रहार......

जाहिरात

 

बच्चूभाऊंच्या आंदोलनाला राष्ट्रानायक महादेवजी जानकर यांचा पाठींबा

schedule11 Jun 25 person by visibility 222 categoryमहाराष्ट्र

सुशांत पोवार (विशेष वृत्त) - आज अमेरिकेसारख्या देशात सरकार विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. इकडं आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू यांनी चार दिवसांपासून अन्नत्याग केलाय. आज हे उपोषण संयमानं सुरू आहे. या उपोषणाचं गांभीर्य सरकारनं घ्यायला हवं. संयमाचा बांध मात्र फुटू देऊ नका, असा सल्ला राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी सरकारला दिलाय.

               शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसंदर्भात बच्चू कडू यांनी रविवारपासून गुरुकुंज मोझरी इथं अन्नत्याग आंदोलन सुरू केलय. बुधवारी महादेव जानकर यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली. जवळपास अर्धा तास त्यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली. बच्चू कडू यांच्यासह उपोषणावर असणाऱ्या प्रहार कार्यकर्त्यांचीही महादेव जानकर यांनी चौकशी केली. "विधानसभा निवडणुकीच्यावेळी सरकारनं जे वचन जनतेला दिलं होतं. त्याची वाचनपूर्ती सरकारनं करावी हीच आमची मागणी आहे. आम्ही एसीमध्ये बसून नेते झालो नाही. आम्हाला जनतेचं दुःख कळतं. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, दिव्यांगांना न्याय देणार अशी अनेक वचने सरकारनं निवडणूक काळात दिलीत. आता जनता हुशार झाली आहे. जनतेनं ठेवलं तर जनता सरकारचा डोलारा उलथवू शकते," असा इशारा देखील महादेव जानकर यांनी दिला.

काय आहेत बच्चू कडू यांच्या मागण्या

  • शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी.

  • दिव्यांग आणि विधवा महिलांना सहा हजार मानधन देण्यात यावं.

  • आपत्कालीन संकटमुळं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफ करून देण्यात यावी. तसंच शेतमालाला MSP (किमान दर) वर 20% अनुदान देण्यात यावं.

  • 06 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार शासन निर्णय काढण्यात यावे.

  • वंचित घटकांना वगळता सर्व गोरगरीब समांतर राहणाऱ्या आणि सन्मानजनक वागणूक हवी असलेल्या व सध्या विविध अडचणीत असलेल्या घटकांनाही सन्मानजनक घरकुल द्यावं.

  • शहरासारख्या ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष लागू करून किमान 5 लाख रूपयांचे अनुदान घरकुल लाभार्थ्यांना द्यावे.

  • आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ स्थापून 10 लाख रूपयांची आर्थिक मदत देत संपूर्ण कर्जमाफी द्यावी.

  • रोजंदारी करणाऱ्या सर्व मजुरांना MREGS मध्ये घेण्यात यावं. तसंच फळपीकांत 3:5 प्रमाण लागू करून MREGS मध्ये जोडण्यात यावं. दररोज होणाऱ्या श्रमाच्या बदल्यात एक हजार मजुरी दिली जावी.

  • संजय गांधी योजनेत पात्र लाभार्थ्यांना तात्काळ संपूर्ण मंजूर रक्कम देण्यात यावी.

  • शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना लागू करून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी.

  • 100 टक्के दिव्यांग व अपंग व्यक्तींना शासकीय नोकरीत पाच टक्के आरक्षण द्यावं.

  • शासकीय नोकर भरतीत इतर मागास प्रवर्ग (OBC) चे आरक्षण 27% ठेवावे.

  • शेतमाल विमा योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर द्यावा. विमा हप्त्याचे 50% पेक्षा जास्त शुल्क शासनानं द्यावं.

  • शेतकऱ्यांना खत, बियाणे विनाशुल्क द्यावं.

  • शेतीसाठी लागणाऱ्या वीजेचे बील माफ करून सतत वीजपुरवठा करण्यात यावा.

  • शेतमालास हमी भाव मिळत नसल्यामुळं शेतकरी आत्महत्या करत आहेत. शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावानं शेतमालाची खरेदी करावी.

  • धनगर समाजाचे आरक्षण तत्काळ लागू करून धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत 13% आरक्षण द्यावे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes