Breaking : bolt
कोल्हापूर जिल्हा आरोग्य विभागाच्या विरोधात मुंबई आरोग्य भवनच्या दारात रासपचा उग्र आंदोलनाचा इशाराआमदार डॉ राहुल प्रकाश आवाडे यांच्यामुळे प्रभागातील विकास कामांना गतीशिळफाटा येथील रस्ता रुंदीकरणासाठी "आप"ने पुकारले उपोषणाचे हत्यार, १५ मे ला डॉ. पठाण बसणार उपोषणालाराजकपूर पुतळ्यासमोरील रंकाळा गार्डमध्ये मृत माशांचा खच, मासे कुजल्याने परिसरात दुर्गंधीआरोग्य विभागाची लक्तरे टांगली वेशीवर, सोलापूर मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखलबोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा, वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र नसतानाही छोटा दवाखाना सुरु!सिव्हील हॉस्पीटल मिरज येथून अपहरण झालेले ३ दिवसाचे बाळ ४८ तासाचे आत हस्तगतआरोग्यचे आयुक्त अँक्शनमोडवर, मनपाचे आरोग्य अधिकारी यांची बदली आणि चौकशीचे आदेशडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलंच पत्रकारी स्वरूपाचं लेखन 'मूकनायक'च्या पहिल्या अंकात....'मॅनेज' निविदेचा प्लॅन उधळला ? आता दोषींच्या चौकशीअंती निलंबनाची मागणी

जाहिरात

 

निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून नाना पुन्हा जनतेत..

schedule02 Dec 24 person by visibility 276 categoryराजकीय घडामोडीकोल्हापूर

जमीर शेख (कोल्हापूर) - कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी गेले २.५ वर्ष तयारी करत असताना जनतेत उतरून निवडणुकीसाठी तयारी केली असताना महायुतीच्या जागा वाटपामुळे ही जागा शिवसेनेला गेली आणि याठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली. राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाल्या नंतर त्यांनी नाराज न होता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार स्वतः उमेदवार असल्या प्रमाणे त्यांनी प्रचार यंत्रणा राबवत राजेश क्षीरसागर यांच्या  विजयात सिंहाचा वाटा उचलला . त्यासाठी स्वतः शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे , श्रीकांत शिंदे आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दूरध्वनीवरून सत्यजित कदम यांचे अभिनंदन केले. 

निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून नाना पुन्हा जनतेत..

२३ नोव्हेंबर ला निकाल लागल्यानंतर २४ तारखेला सत्यजीत कदम यांनी सुरू असलेल्या कामांची स्वतः पाहणी केली तर ज्या लोकांना प्रचार काळात काम करायचं आश्वासन दिले होते त्या ठिकाणी प्रत्यक्षात संबधित अधिकारी वर्गाला घेवून पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.  यावेळी त्यांनी शहरातील नवीन कामांचा शुभारंभ, चालू कामांची पाहणी आणि भविष्यात करायची काम यात ते व्यस्त असून त्याचबरोबर कोल्हापूर शहर आणि परिसरातील सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होऊन आपल्या जनसंपर्काचा धडाका कायम ठेवला आहे. कोल्हापूर शहरातील बहुप्रतीक्षित अशा कोल्हापूर शहराच्या रिंग रोडच्या कामासाठी ३.५० कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ केला तर मोरेवाडी ते एसएससी बोर्ड रोडच्या कामासाठी रवींद्र चव्हाण यांच्याकडून १२.५० कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळवली असून त्याठिकाणी यूटिलिटी , हेरिटेज स्ट्रीट लॅम्प आणि काँक्रेट आणि डांबरी रस्त्याच्या माध्यमातून रस्त्याच्या कायापालट करण्यासाठी स्वतः प्रत्यक्ष जातीने हजर राहून स्थानिक नागरिक आणि अधिकारी यांच्या माध्यमातून परिपूर्ण असा आराखडा तयार केला.

                  या कामात त्यांना दक्षिणचे आमदार अमल महाडीक आणि उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांची साथ मिळत असून जनतेतून मिळणारा प्रतिसाद हा अविश्वसनीय आहे .

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes