Breaking : bolt
बनावट औषध पुरवठा प्रकरण बाहेर येऊ नये म्हणूनचंं तर झाले नसेल औषध निर्माण अधिकाऱ्याचंं निलंबन ?गणपती व आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील मानव गवंडी टोळी हद्दपारसंजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील सागर लोखंडे टोळी हद्दपार; सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात २ वर्षे प्रतिबंधितमुल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची फसवणूक, दागिने चोरी करणारा संशयित जेरबंदराष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपकोट्यवधींचा औषध खरेदी घोटाळा उजेडात, कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांची "आरोग्य भवन" वारी ?ठाकरे "ब्रँँड" ला धक्का पोहोचवणारा निकाल, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचा ठाकरे बंधूंना टोमणा !केंद्र सरकारची मुख्य निवडणूक आयुक्तांमुळे कोंडी होण्याची शक्यता, २४ तासात महाभियोग आणण्याची तयारी.....स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून कोकणात महायुतीतील बडे नेते राणे - सामंत यांच्यात तणाव.....?मागायला गेला "दाद" घातली कंबरेत "लाथ", लोकशाहीच्या आत्म्यावरचा प्रहार......

जाहिरात

 

महादेव जानकरांचा भाजपसोबत युतीवर धक्कादायक दावा

schedule31 Jul 25 person by visibility 252 categoryराजकीय घडामोडी

सुशांत पोवार (विशेष वृत्त) - अकोला येथे रविवारी घेतलेल्या एका विशेष बैठकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपसोबतची युती हा भूतकाळातील सर्वात मोठा राजकीय चूक असल्याचे वक्तव्य केले. त्यांनी यावेळी भाजपवर गंभीर टीका करत, भाजपचे धोरण बदनाम नेत्यांना दबावाखाली आपल्या पक्षात आणून विस्तार करण्याचे असल्याचा आरोपही केला.

             जानकर म्हणाले की, भाजपला पराभूत करण्यासाठी आता त्यांनी भाजपपासून दूर जाऊन कोणत्याही पक्षाशी युती करायला तयार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “भाजप ही आता काँग्रेसमध्ये रूपांतरित झाली आहे.” आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष जिथे शक्य तिथे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, मनसे, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आघाडी करणार आहे. जिथे आघाडी शक्य नाही, तिथे पक्ष स्वतंत्रपणे लढेल.

              भाजपला पराभूत करण्यासाठी ते राजू शेट्टी, बच्चू कडू, शेतकरी कामगार पक्ष तसेच रविकांत तुपकर यांसह सहकार्य करण्याचा मानस तुटवणार असल्याचे जानकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, २०१९ मध्ये लोकसभेची लढत लढणार असून यापुढे केंद्रातील राजकारणात राहणार आहेत आणि मंत्रीपदी येण्याचा त्यांचा ठाम विश्वास आहे.

            जानकर यांनी आपल्या पक्षाला डिमांडर नाही तर कमांडर म्हणत, देवेंद्र फडणवीससारखे लोक कार्यकर्ते आहेत तर ते नेते असल्याचा दावा केला. त्यांनी आपल्या बहिणी पंकजा मुंडेचा उल्लेख करत ती तसेच तिच्या कुटुंबाला सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही सांगितले. यापूर्वी राजकीय संघर्ष उद्धव ठाकरे यांच्याशी होता पण आता काँग्रेस, उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे यांसह एकत्र येऊन आघाडी करण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes