सर्दी,खोकला यावर उपाय
लवंग,मनुका यांचा काढा व मध यांच्या गुळण्या कराव्यात .
वेखंडाची धुरी घ्यावी,सुंठवडा खावा.ज्येष्ठमध काढा + मध व खडीसाखर घालून घ्यावा.
वारंवार तहान लागणे यावर उपाय.
खजूर पाण्यात भिजत ठेवावी.१ तासाने हे पाणी गाळून पिण्यास द्यावे.डाळिंबाचा रस प्यावा.
भूक न लागणे यावर उपाय
ताजे ताक व वेलची पावडर + खडीसाखर घालून प्यावे .
मूगडाळीचे सूप प्यावे.
पोटदुखीवर उपाय
पोटावर चंदनाचा लेप लावावा,गुलाब पाकळ्या पिण्याच्या पाण्यात टाकाव्यात व हे पाणी प्यावे.
वजन कमी यावर उपाय
१ ग्लास दुध + १ चमचा शतावरी पावडर,आक्रोड,काजू पावडर खाण्यात ठेवावी .
काळी खजूर तुपात भिजत ठेवावी , दररोज सकाळी २ व रात्री २ खजूर खाव्यात.
केस गळणे यावर उपाय
बदाम तेलाने केसांना मसाज करावा.
स्त्रियांमध्ये अंगावरून जास्त जाणे.
१ कप दुध + पाव चमचा सुंठ पावडर + १ चमचा शतावरी पावडर घ्यावी .गुलाब पाकळ्या व मध एकत्र करून खावे.
संडासावाटे रक्त पडणे यावर उपाय
बेलचा मुरंबा खावा.
नाकातून रक्त येणे.
दुर्वांचा रस २ थेंब नाकपुडीत टाकावा.
डायबेटीस/मधुमेह यावर उपाय
हळद,जांभूळ बी पावडर व आवळा पावडर प्रत्येकी समभाग घेऊन सकाळी उपाशीपोटी खावी.
सांधेदुखी,कटकट आवाज यावर उपाय
हळदीने सिद्ध केलेल्या खोबरेल तेलात कापूर टाकून सांध्याना मसाज करावा,दुखणाऱ्या भागावर ज्येष्टमध पावडरचा लेप लावावा.(१ कप दुध + १/२ चमचा डिंक पावडर + १ चमचा खारीक पावडर असे मिश्रण जेवणानंतर १ तासाने प्यावे.)
चक्कर येणे यावर उपाय
सकाळी उपाशीपोटी मोरावळा खावा.(डाळिंब,संत्री,मोसंबी , लिंबू , द्राक्षे यापैकी उपलब्ध असेल त्या फळाचा रस घ्यावा.)
मानसिक ताण यावर उपाय
दीर्घश्वसन करा.अनुलोम – विलोम प्राणायम करा.
तुपात केलेले उडीद पीठाचे लाडू खावेत.
दुध व केशर रोज झोपण्यापूर्वी घ्यावे .
संडासला कडा बनवण्यावर उपाय
१५ काळ्या मनुका रात्री पिण्याच्या पाण्यात भिजवाव्यात सकाळी उपाशीपोटी खाव्यात.
लघवीला जळजळ उपाय
१ ग्लास पाणी + १ चमचा धना पावडर + १ चमचा मध हे मिश्रण प्यावे .
घामामुळे अंगाला दुर्गंधवर उपाय
चंदन , कापूर पावडर अंगाला चोळावी.