संजय सुतार (कोल्हापूर) - महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक नियमानुसार नाटयगृहातील अग्निशमन सुविधा सुस्थितीत असलेबाबत शासनाने निदर्शित केलेले लायसन होल्डर यांच्याकडून महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे फायर ऑडीट व अग्निशमन उपकरणे सुस्थितीत असलेबाबत दि.14 जून 2024 रोजी बी फॉर्म (फायर ऑडीट रिपोर्ट) सादर केलेला आहे. त्यानुसार या ऑडिट रिपोर्टची मुदत 1 वर्षासाठी असून या फायर ऑडीटचा डी फॉर्म (फायर ऑडीट रिपोर्ट) सर्वांना पाहण्यासाठी अग्शिमन विभागात उपलब्ध करुन ठेवलेला आहे.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाटयृहाचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेणेच्या सूचन प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी शहर अभियंत्यांना दिल्या आहेत. या आदेशानुसार स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे काम सुरु करण्यात येत आहे. या स्ट्रक्चरल ऑडीटच्या रिपोर्ट प्राप्त झाल्यावर तात्काळ नाटयगृहाच्या पुर्नरबांधणीसाठी अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे शनिवारी दुपारी चौकशी समितीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्यात आली. यावेळी चौकशी समितीचे अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे उपस्थित होते.