डॉ.प्रमोद पाठक - वात कमी होण्यासाठी सर्वप्रथम वातप्रकृती असेल तर वात होणाऱ्या पदार्था पासून दूर राहणे. बटाटा, वांगे, ढोबळी, कोबी, गवार, फ्लॉवर, तूर, हरबरा डाळ, बेसन. कडधान्ये बनवताना ती मोड आणून नीट शिजवून चावून खावी. भाकरी खावी, चपाती ओवा घालून बनवावी. तळलेले काहीही नको.
जेवणाआधी एक तास, जेवणामध्ये आणि जेवणानंतर एक तास पाणी पिऊ नये. पिल्यास गरम पाणी प्यावे. जेवल्यावर लगेच झोपू नये. शतपावली करावी. वाम कुक्षी त्यानंतर दहा वीस मिनिट करावी म्हणजे डाव्या हातावर झोपावे. दोन जेवणाच्या मध्ये चार तास अंतर ठेवा. अध्येमध्ये काहीही खाऊ नये म्हणजे पचन नीट होते. वात हा फिरता राहिला तर त्रास देत नाही म्हणून शारीरिक हालचाल हवी, व्यायाम हवा. लवकर उठणे आणि लवकर झोपणे आवश्यक आहे. टेन्शन घेण्याने सुद्धा वात होतो. त्यामुळे प्राणायाम योगा करा. आयुर्वेद हा जीवन शैली सुधारून उपचार करतो. त्यामुळे औषध शोधण्या पेक्षा आधी खाणे, पिणे, झोपणे, उठणे सुधारा. बाकी वातावर शेंदेलोण मीठ वगैरे घालून नीरसे ताक प्या, ज्याने पचन सुधारेल आणि वात सुद्धा. डाळींब रस घेत जा. रात्री झोपण्याच्या 1/2 तास अगोदर शेकून घेतलेला ओवा आणी कोमट पाणी प्यावे.