Breaking : bolt
बनावट औषध पुरवठा प्रकरण बाहेर येऊ नये म्हणूनचंं तर झाले नसेल औषध निर्माण अधिकाऱ्याचंं निलंबन ?गणपती व आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील मानव गवंडी टोळी हद्दपारसंजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील सागर लोखंडे टोळी हद्दपार; सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात २ वर्षे प्रतिबंधितमुल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची फसवणूक, दागिने चोरी करणारा संशयित जेरबंदराष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपकोट्यवधींचा औषध खरेदी घोटाळा उजेडात, कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांची "आरोग्य भवन" वारी ?ठाकरे "ब्रँँड" ला धक्का पोहोचवणारा निकाल, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचा ठाकरे बंधूंना टोमणा !केंद्र सरकारची मुख्य निवडणूक आयुक्तांमुळे कोंडी होण्याची शक्यता, २४ तासात महाभियोग आणण्याची तयारी.....स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून कोकणात महायुतीतील बडे नेते राणे - सामंत यांच्यात तणाव.....?मागायला गेला "दाद" घातली कंबरेत "लाथ", लोकशाहीच्या आत्म्यावरचा प्रहार......

जाहिरात

 

गांजाची तस्करी करणारे इचलकरंजी, सांगली, सातारा व सोलापूर येथील आठ आरोपींना अटक

schedule09 Jun 25 person by visibility 223 categoryक्राइम न्यूज

अंजुम देसाई (कोल्हापूर) - कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैद्य व्यवसाय, अंमली पदार्थ साठा तसेच विक्री करणारे गुन्हेगारांचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत.पोलीस अधीक्षक यांनी दिले आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस अधीकारी व अंमलदार यांची पथके तयार करुन अवैद्य व्यवसाय तसेच अंमली पदार्थाचे अनुषंगाने माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, हातकणंगले ते कुंभोज जाणारे रोडवर नेज गावचे हद्दीत दोन इसम महिंद्रा बोलेरो गाडीतून इचलकरंजी येथील इसमांना गांजा विक्री करण्यासाठी येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती. मिळाले बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दोन्ही पथकासह हातकणंगले ते कुंभोज जाणारे रोडवर नेज येथे सापळा लावून गांजा विकत घेणारे दिपक दत्तात्रय पुजारी, वय 37, व्यवसाय-स्क्रॅप, रा. सांगली नाका, इचलकरंजी, विवेक मेघदुत शिंदे, वय 28, व्यवसाय-फळविक्री, रा. मंगळवार पेठ, गांधी पुतळा, इंचलकरंजी व गांजा विक्री करणेकरिता आलेले अंकुश प्रताप शिंदे, वय 30, व्यवसाय-मजुरी, नंदकिशोर भिकु साठे, वय 30, व्यवसाय चालक, दोघे रा. बामणी, ता. खानापुर, जि. सांगली यांना पकडून त्यांचे कब्जातून 21 किलो 070 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, गांजाची वाहतुक करणेसाठी वापरलेली 1 महिंद्रा बोलेरो गाडी व 1 बुलेट गाडी तसेच 5 मोबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम असा एकूण 16 लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला. त्यांचे कब्जात मिळालेला गांजा कोठुन आणला याबाबत त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून त्यांना अधिक विश्वासात घेवून तपास केला असता इसम नामे विवेक शिंदे व नंदकिशोर साठे यांनी सदरचा गांजा खरसुंडी, जिल्हा सांगली येथुन आणला असलेचे सांगीतले. त्यांचे माहितीने खरसुंडी ता. आटपाडी, जिल्हा सांगली येथे जावून इसम नामे मनोज मदन गोसावी, वय 29, व्यवसाय शेती, रा. महादेव नगर अकलुज, ता. माळशिरस, जि. सोलापुर, राजु अमिन शेख, वय 30, व्यवसाय- गुरेपाळने, रा. कृष्णप्रिया नगर अकलुज, ता. माळशिरज, जि. सोलापुर, महेश जम्मु साळुंखे, वय 32, व्यवसाय-पुजारी, रा. खरसुंडी, ता. आटपाडी, जि. सांगली, देवदास महादेव तुपे, वय 21, व्यवसाय चालक, रा. पालवण चौक पालवण, ता. दहिवडी, जि. सातारा यांना पकडून त्यांचे कब्जातून 20 किलो 125 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, गांजाची वाहतुक करणेसाठी वापरलेली 1 टाटा झेस्ट गाडी, 5 मोंबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम असा एकूण 14 लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला.

               वरील प्रमाणे गांजाची तस्करी करणारे इचलकरंजी, सांगली, सातारा व सोलापूर येथील 8 इसमांना पकडून त्यांचेकडून तब्बल 41 किलो 195 ग्रॅम गांजा तसेच गांजाची वाहतुक करणेसाठी वापरलेली 1 महिंद्रा बोलेरो, 1 टाटा झेस्ट, 1 बुलेट अशी वाहने, 9 मोबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम असा एकूण 30 लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे. नमुद इसमांचे विरुध्द हातकणंगले पोलीस ठाणेस एन.डी.पी. एस. कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास हातकणंगले पोलीस ठाणे करवी सुरू आहे.

             सदरची कामगिरी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, विशाल खराडे, प्रदिप पाटील, योगेश गोसावी, संतोष बरगे, अरविंद पाटील, परशुराम गुजरे, शिवानंद मठपती, अशोक पोवार, गजानन गुरव, महादेव कुराडे, राजेश राठोड, हंबीरराव अतिग्रे व राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes