सचिन तळेकर (लातूर) - राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे गुरुवार, ३० जानेवारी २०२५ रोजी लातूर दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सहकार मंत्री ना. पाटील हे सकाळी ९ वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवास येथे कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील. सकाळी १० वाजता शिरूर ताजबंद येथून नांदेडकडे प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे आयोजित जीवनसाधना गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याला ते उपस्थित राहतील. दुपारी १२ वाजता लातूर जिल्हा नियोजन समिती बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहतील. नांदेड जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून दुपारी २ वाजता त्यांचे अहमदपूर तालुक्यातील गंगाहिप्परगा येथे आगमन होईल. येथे भागवत कथा आणि ज्ञानयज्ञ सोहळ्याला उपस्थित राहतील.
सहकार मंत्री ना. पाटील यांचे दुपारी ३ वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवास येथे आगमन होईल व राखीव. सायंकाळी ६.३० वाजता शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयामध्ये मोहनराव पाटील व्याख्यानमाला कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. रात्री ८ वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवास येथे आगमन होईल व राखीव.