Breaking : bolt
सोलापूरच्या पुरवठादाराची काही अधिकाऱ्यांच्या अवैध खरेदी प्रकरणी थट्टात्मक चर्चा, राजकीय ताणतणाव वाढण्याची शक्यताकोथरूड पोलिसांचा नंगानाच ? नेमकी खाकी असते कशासाठी त्या पीडितांचा सवाल !विश्रामबाग पोलिसांची मोठी कामगिरी; ९०० नशेच्या गोळ्या जप्त, तीन संशयितांना अटकसोन्याच्या दागिन्यांसह रायफल चोरी प्रकरणी संशयिताला अटक"पेटा" वर भारतात बंदी घालण्याची वेळ आली आहे का ? पेटाचं अमेरिकेतील पडद्यामागील वास्तव !पक्षांतर प्रकरणातील न्याय निर्णयांवर ठाकरे गटाचा संतापसुनील तटकरे यांच्या रणनीतीमुळे रायगडमध्ये शिवसेनेला धक्का, राजीव साबळे राष्ट्रवादीत दाखलफडणवीस राज्यपालांची भेट घेऊन नवीन धक्का देण्याच्या तयारीत, राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठी घडामोड घडते याचे स्पष्ट संकेतबीएसएनएल कंपनीच्या मोबाईल टॉवरची लाईट गेल्यास रेंज गायबदापोलीतून "एक राखी जवानांसाठी" अभियानाअंतर्गत सीमेवर राख्या रवाना !

जाहिरात

 

धोकादायक उद्योगात किशोरवयीन कामगार आढळल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधा - सहाय्यक कामगार आयुक्त वि.वि. घोडके

schedule09 Jun 23 person by visibility 193 categoryमहाराष्ट्र

वसीम सय्यद (कोल्हापूर) - कोणत्याही व्यवसायात 14 वर्षाखालील बालक काम करताना अढळल्यास अथवा धोकादायक उद्योग व प्रक्रिया करणा-या संस्थामध्ये 18 वर्षाखालील किशोरवयीन कामगार कामावर ठेवल्याचे निदर्शनास आल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त वि.वि. घोडके यांनी केले आहे.
          जिल्ह्यातील सर्व आस्थापना, दुकाने, कारखाने व अन्य व्यावसायिकांनी बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 2016 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवणे तसेच 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियामध्ये कामावर ठेवणे हा गुन्हा आहे. मालकाने, नियोक्त्याने बालक अथवा किशोरवयीन मुलास कामावर ठेवल्यास त्यांना 20 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत दंड अथवा 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत कारावास होवू शकतो किंवा दोन्हीही शिक्षा होवू शकतात, असेही श्री. घोडके यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
कार्यालयाचा पत्ता : सहाय्यक कामगार आयुक्त, कोल्हापूर 597, ई, व्यापारी पेठ, शाहुपुरी, कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक : 0231-2653714 ई-मेल आयडी- aclkolhapur@gmail.com

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes