सारंग डवरी (सिंधुदुर्ग) - रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजय व्हावा याकरिता राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्षा उज्वला येळावीकर आणि कुडाळ शहर अध्यक्ष विजय येळावीकर यांनी मतदारसंघात गाटीभेटी घेऊन प्रचाराचा वेग वाढविला आहे.
रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधे भाजपा - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस - मनसे - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया - भाजपा भटके विमुक्त आघाडी तसेच राष्टीय समाज पक्ष महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय समाज पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षा सौ.उज्वला येळावीकर ( शिंदे ) तसेच कुडाळ शहर अध्यक्ष विजय येळावीकर ( शिंदे ) यांच्या अथक प्रयत्नांना मतदार संघात यश येत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना एकत्र करून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडून देण्यासंदर्भात सांगण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षा सौ.उज्वला येळावीकर ( शिंदे ) तसेच कुडाळ शहर अध्यक्ष विजय येळावीकर ( शिंदे ) यांनी मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले व राष्ट्रीय समाज पक्ष वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. येणाऱ्या ७ मे रोजी कमळ चिन्हावर बटण दाबून आपले मतदानाचा हक्क बजावण्यास सांगण्यात आले.