Breaking : bolt
बनावट औषध पुरवठा प्रकरण बाहेर येऊ नये म्हणूनचंं तर झाले नसेल औषध निर्माण अधिकाऱ्याचंं निलंबन ?गणपती व आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील मानव गवंडी टोळी हद्दपारसंजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील सागर लोखंडे टोळी हद्दपार; सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात २ वर्षे प्रतिबंधितमुल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची फसवणूक, दागिने चोरी करणारा संशयित जेरबंदराष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपकोट्यवधींचा औषध खरेदी घोटाळा उजेडात, कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांची "आरोग्य भवन" वारी ?ठाकरे "ब्रँँड" ला धक्का पोहोचवणारा निकाल, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचा ठाकरे बंधूंना टोमणा !केंद्र सरकारची मुख्य निवडणूक आयुक्तांमुळे कोंडी होण्याची शक्यता, २४ तासात महाभियोग आणण्याची तयारी.....स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून कोकणात महायुतीतील बडे नेते राणे - सामंत यांच्यात तणाव.....?मागायला गेला "दाद" घातली कंबरेत "लाथ", लोकशाहीच्या आत्म्यावरचा प्रहार......

जाहिरात

 

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

schedule16 Aug 24 person by visibility 714 categoryकोल्हापूर

वसीम सय्यद (कोल्हापूर) - शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत एन.एस.टी.एफ.डी.सी.नवी दिल्लीच्या धर्तीवर शासनामार्फत स्वयंरोजगाराच्या कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. जुन्नर येथील शबरी शाखा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणारे पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापुर, कोल्हापुर, उस्मानाबाद, बीड, लातुर या जिल्ह्यातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या जिल्ह्यातील आदिवासी समाजातील इच्छुक उमेदवारांनी www.mahashabari.in या संकेतस्थळाच्या माध्यमातुन दि. 15 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन कर्ज फॉर्म भरावेत, असे आवाहन जुन्नर शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे शाखा व्यवस्थापक रा.भ. पाटील यांनी केले आहे. यासाठी कोणत्याही प्रकारे ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
जुन्नर शाखा कार्यालयास सन 2024-25 साठी महिला सबलीकरण योजना (रु. 2 लक्ष)- 22, कृषी आणि संलग्न व्यवसाय (रु. 5लक्ष)-6, हॉटेल ढाबा व्यवसाय (रु.5 लक्ष)- 6, ऑटो वर्क शॉप/ स्पेअर पार्ट (रु. 5लक्ष) -6, वाहन व्यवसाय (रु.10 लक्ष पेक्षा जास्त व रु. 15 लक्ष पर्यंत)-8 याप्रमाणे योजनानिहाय लक्षांक प्राप्त झाला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes