सुनील इनामदार - प्रेमीयुगुल हे एकमेकांना वेगवेगळे गिफ्ट देऊन व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. या दिवशी बरेच लोक आपल्या पार्टनरला गुलाब भेट म्हणून देतात. प्रेमाचं प्रतिक असणाऱ्या गुलाबाचा वापर विविध फेसपॅक तयार करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. गुलाबाचा वापर करुन फेसपॅक कसा तयार करायचा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घ्या रोज फेस पॅक तयार करायची सोपीपद्धत...
गुलाब पेस्ट तयार करण्याची सोपी पद्धत...
गुलाबाचे विविध फेसपॅक तयार करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुलाबाची पेस्ट तयार करावी लागेल. ताज्या गुलाबाच्या पाकळ्या घ्या आणि त्या पाण्यानं स्वच्छ करा. या पाकळ्या मिक्समध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. या पेस्टचा वापर तुम्ही विविध फेसपॅक तयार करण्यासाठी करु शकता.
गुलाब हनी फेस पॅक(Honey And Rose Facepack)...
तयार केलेल्या गुलाबाच्या पेस्टचा वापर करुन तुम्ही गुलाब हनी फेस पॅक तयार करु शकता. यासाठी गुलाबपेस्टमध्ये गुलाब पाणी आणि मध मिक्स करा. हा पॅक चेहऱ्याला 20 मिनिटे लावा. त्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुवा. या पॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा हायड्रेट राहिल. तसेच चेहऱ्यावरील डाग देखील या फॅसपॅकमुळे कमी होतील.
गुलाब चंदन फेसपॅक(Sandalwood And Rose Facepack)...
गुलाबा पेस्टमध्ये चंदन पावडर मिक्स करा. त्यानंतर या मिश्रणात थोडे एक किंवा दोन चमचे दूध टाका. हा पॅक चेहऱ्यावर लावताना मसाज करा. हा पॅक जवळपास दहा मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा. या फेसपॅकमुळे चेहऱ्याचे स्क्रबिंग होते. त्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते.
कोरफड जेल आणि गुलाबाचा पॅक (Aloe Vera And Rose Facepack)...
गुलाबाच्या पेस्टमध्ये कोरफड जेल मिक्स करून चेहऱ्याला लावा. वीस मिनिटांनी चेहरा धुवा. या पॅकमुळे स्किन टायनिंग होते. तसेच चेहऱ्यावरील डाग देखील जातात.