इरफान मकानदार (कोल्हापूर) - राजर्षी छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव निमित्त 25 ते 30 जून 2024 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार 27 जून 2024 रोजी माणगांव ता. हातकणंगले येथे माणगांव येथील स्मारकास अभिवादन करुन ए.पी. मगदुम हायस्कूलमध्ये सकाळी 10.30 वाजता जाहीर परिसंवादाचे आयोजन केले असून या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
परिसंवाद कार्यक्रमामध्ये माणगांव परिषद सामाजिक परिवर्तनाचा मानबिंदू या विषयावर प्रसिध्द वक्ते प्राचार्य, डॉ. टी.एस. पाटील व समाज अभियांत्रिकी आणि राजर्षी शाहू या विषयावर प्रसिध्द विचारवंत प्रा. डॉ. शरद गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहितीही श्री. साळे यांनी दिली आहे.