Breaking : bolt
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अंगात देवी आल्याचे सोंग करणाऱ्या महिलेचा केला भांडाफोडजोतिबा डोंगरावर नेमकं काय घडलं ? मारहाणीचा प्रकार कशामुळे झाला ? दोन्ही बाजूंनी काय दावे केले जात आहेत ? आणि सत्य नेमकं आहे काय ? पाहुयात संपादकीय मधून....अमेरिका एका प्रचंड मोठ्या हल्ल्याची तयारी करतो आहे का ? दुसऱ्या महायुद्धातील हिरोशिमा आणि नागासाकी वरती टाकलेल्या अणुबॉम्ब सारखी शक्यता आहे की काय ? संपादकीय विश्लेषण....महाराष्ट्र हादरला! बापाने दोन मुलींना रात्रभर उलटं टांगलं, पुढे खूपच भयानक घडलं, धक्कादायक कारण...आरोग्याकडे दुर्लक्ष करत बजेटमध्ये ४४ टक्के कपात, आरोग्य विभाग 'राम भरोसे'उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवडीची पहिली इच्छा व्यक्त करणारे नरहरी झिरवाळ यांचा एसीपीचा ट्रॅप आणि आत्ताचा व्हीडीओ काढून मिडियाला देणारा झारीतले शुक्राचार्य कोण ?आमदार राहुल आवाडे यांचे आमदार सतेज पाटील यांच्याबद्दलचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे - संजय पोवारदिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्यनिमेस्युलाईडचं प्रमाण १०० ग्रॅमहून अधिक असणाऱ्या औषधांवर बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजन

जाहिरात

 

जोतिबा डोंगरावर नेमकं काय घडलं ? मारहाणीचा प्रकार कशामुळे झाला ? दोन्ही बाजूंनी काय दावे केले जात आहेत ? आणि सत्य नेमकं आहे काय ? पाहुयात संपादकीय मधून....

schedule30 Mar 26 person by visibility 65 categoryकोल्हापूरसंपादकीय

सुशांत पोवार (संपादकीय) - दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्री यात्रा काही महिन्यांवर आली आहे. दरवर्षी या काळात ज्योतिबाच्या डोंगरावर उत्साह असतो गुलालाची उधळण करणाऱ्या भाविकांची गर्दी असते पण सोमवारी २३ मार्चला ज्योतिबाच्या डोंगरावर शांतता होती, कारण ज्योतिबा डोंगर परिसरातल्या ग्रामस्थानी कडकडीत बंद पाळला होता. त्या डोंगरावरचे व्यापारी असोसिएशन सुद्धा यात सहभागी झाली आणि डोंगरावर पाहायला मिळाली ती फक्त शांतता. सोमवारी ही शांतता असण्याचं कारण होतं रविवारी घडलेला एक प्रकार रविवारी सासनकाठी घेऊन आलेले भाविक आणि मंदिराचे पुजारी यांच्यात वाद झाल्याची घटना घडली त्यानंतर काही पुजाऱ्यांनी एकत्र येत भाविकांना मारहान केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. भाविकांनी पुजाऱ्यांवर आरोप केले तर पुजाऱ्यांनी भाविकांवर वाद एवढा वाढला की पोलिसांनी यात हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंच्या एकूण ३४ जणांवर गुन्हे दाखल केले पण ज्योतिबा डोंगरावर नेमकं काय घडलं मारहानीचा प्रकार कशामुळे झाला दोन्ही बाजूंनी काय दावे केले जातात आणि सत्य नेमकं काय आहे पाहूयात निर्भीड पोलीस टाइम्सच्या संपादकीयमधून.....
               सगळ्यात आधी बघूयात नेमकं काय घडलं तर माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार रविवारी करवीर तालुक्यातल्या परिते गावाची सासनकाठी ज्योतिबाच्या डोंगरावर पोहोचली त्यावेळी सासन काठी सोबत आलेले भाविक काठी नाचवत होते सोबत वाजंत्री सुद्धा होते त्यामुळे जल्लोष सुरू होता त्यानंतर काठीने मंदिराला प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली तेव्हा पुजारी देवस्थान समितीचे कर्मचारी आणि भाविक यांच्यात वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की पुजाऱ्यांच्या टोळक्याने भाविकांना मारहान केली. अगदी लाता बुक्क्या मारल्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर बातम्यांमध्ये मध्ये व्हायरल झाला आणि या प्रकरणाची चर्चा सगळ्या महाराष्ट्रभर होऊ लागली. पण यात काही प्रश्न अनुत्तरित होते. वाद का झाला ? वाद इतका टोकाला का गेला की थेट मारहाण झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदादावे करण्यात येऊ लागले. पुजाऱ्यांनी आरोप केला की यातले काही भाविक हे मध्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी पुजाऱ्यांना मारहाण केली. माध्यमांशी बोलताना पुजाऱ्यांनी सांगितलं दरवर्षी चैत्र यात्रेला ज्योतिबा डोंगरावर मानाच्या १०८ सासनकाट्या येतात. मानाच्या नसलेल्या ५०० ते ६०० सासनकाट्या ही मंदिरात येतात. रविवारी परिते गावाची सासनकाठी डोंगरावर आली असताना तीन प्रदक्षिणा झाल्यावर गावातले तरुण काठी घेऊन मंदिरासमोर आले. त्यातल्या काही मध्यधुंद तरुणांनी रविवारच्या आरतीचे मानकरी ढोले यांच्याशी हुल्लडबाजी केली त्यांची टोपी उडवली आणि गुलाल खोबऱ्यांच्या वाट्या पुजारी मानकरी आणि नवीन आणलेल्या उंटाला फेकून मारल्या. तेव्हा त्यांनी सबुरीने घेण्याबद्दल सुचवलं पण त्यांनी त्यांचं ऐकलं नाही. त्यामुळे वाद झाला पण हा वाद मारहाणीपर्यंत कसा काय गेला ? याबद्दल बोलताना मंदिराचे पुजारी म्हणाले जो किरकोळ वाद झाला होता तो परीते गावचे सरपंच पुजारी आणि देवस्थानचे कर्मचारी यांनी लगेच मध्ये पडून मिटवला त्यानंतर पुन्हा चौथी प्रदक्षणा मारून हे गावकरी आमच्यासमोर आले आणि त्यांनी खुल्लडलडबाजी केली. पण तेव्हा सगळे पुजारी शांत राहिले त्यानंतर ते पुढे गेल्यावर दक्षिण दरवाजाजवळ त्यांना एक पुजारी दिसला तेव्हा ते त्याच्या अंगावर धावून गेले मग त्यांना देवस्थानच्या ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं तेव्हा त्यांनी तिथे सुद्धा धुडकूस घातला. कर्मचाऱ्यांना मारहाण केली एकाचा शर्ट सुद्धा फाडला ऑफिस मधल्या खुर्च्या आणि इतर सामानाची तोडफोड केली एकाला उचलून आपटलं हे सगळं पुजाऱ्यांना सहन झालं नाही आणि मग पुजारी त्यांच्या अंगावर धावून गेले आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला. पण आम्ही पूर्ण गावाला दोष देत नाहीये. गाव चांगलाच आहे. गावच्या सरपंचांनी सुद्धा माफीनामा लिहून दिला आहे काही मध्यधुंद लोक त्यात होती त्यामुळे हा वाद झालाय असा दावा पुजाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना केला. या प्रकरणात पुजाऱ्यांची बदनामी झाली म्हणून बंद पाळण्यात आला. त्यात ज्योतिबा डोंगरावरच्या व्यापाऱ्यांनी सुद्धा सहभाग घेतला. अर्थात ही झाली एक बाजू परी ते गावातल्या काही भाविकांनी हुल्लडबाजी केली. काही भाविक दारू पिऊन आले होते हे आरोप गावकऱ्यांनी फेटाळून लावलेत. गावचे सरपंच विजय उर्फ मनोज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं काही पुजाऱ्यांनी आमच्या भाविकांना विनाकारण शिवीगाळ केली. त्यातून वाद झाला हा वाद मिटवण्यासाठी आम्ही गेलो तेव्हा आम्हाला कोंडून ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला. पुजाऱ्यांनी भाविकांना शोधून शोधून पाठलाग करून मारहाण केली. लाथाबुक्यांनी मारलंच पण डोक्यात नारळ सुद्धा मारले मंदिराला पाच प्रदक्षणा मारायच्या असतात तेव्हा चौथ्या फेरीच्या वेळी आमच्या सोबत असलेल्या भाविकांनी फेकलेला गुलाल आणि खोबऱ्याच्या वाटा काही पुजाऱ्यांना लागल्या तिथे पुजारी आणि गावातल्या भाविकांमध्ये वाद झाला तो वाद लागलीच मिटवण्यात आला होता. पण परत तसच झाल्यानंतर २० ते २५ पुजाऱ्यांनी भाविकांना मारायला सुरुवात केली. ही मारहाण पाहून गावातले घाबरलेले तरुण डोंगरावरती पळायला लागले. सगळे तरुण पळून गेल्यान चार-चार वर्षांच्या पोरांच्या हातात सासनकाठी राहिली. त्यांना काय करावं हे सुचत नव्हतं. त्यावेळी वाद मिटवण्यासाठी काही ज्येष्ठ नागरिकांना घेऊन संस्थांच्या कार्यालयात गेलो. तेव्हा आम्हाला पुजाऱ्यांनी एका खोलीत बंद केलं. पुजारी म्हणाले पोरांना घेऊन या तरच तुम्हाला सोडतो. त्यामुळे परत वाद आणि हानामारी होऊ नये म्हणून मी संस्थानला एक माफीनामा लिहून दिला. त्यानंतर पुजाऱ्यांनी आम्हाला सोडलं असं सरपंच पाटील यांनी सांगितलं तर काही तरुण माध्यपान करून आले होते या आरोपांवर गावकऱ्यांनी सांगितलं परीते गावात पूर्णपणे शाकाहारी यात्रा साजरी केली जाते. या काळात गावात दारू चिकन मटन या सगळ्यांवर बंदी असते. मग गावातले तरुण दारू पिऊन येणार कसे ? पुजाऱ्यांनी भाविकांवर मध्यपान केल्याचे आणि इतर केलेले आरोप हे पूर्णपणे खोटे आहेत. हा सगळा परिते गावाला बदनाम करण्याचा प्रकार आहे अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली.
           सोमवारी ज्योतिबा डोंगरावर बंद पाळण्यात आलेला असताना परिते गावात मूक निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात राजकीय पक्षाचे पदाधिकारी सुद्धा सहभागी झाले होते. त्यांनी या कृत्याचा पर्दाफाश करणार असल्याची ग्वाही दिली. ग्रामस्थानी सुद्धा मोठ्या संख्येने या मोर्चाला हजरी लावली होती. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होत असताना पोलिसांनी या प्रकरणात सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी आणि आपापसात मारहाण करून भाविकांमध्ये भीतीच वातावरण तयार केल्याप्रकरणी ३४ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. कोडोली पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात परितेचे सरपंच मनोज पाटील यांच्यासह १६ गावकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर गणेश गुरव, सुजित चिकलकर यांच्यासह १८ अज्ञात पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कोडोली पोलिसांकडून सुरू आहे. पण यात्रेवेळी ज्योतिबा डोंगरावर मोठा पोलीस बंदोबस्त असतो. हा सगळा पोलिसांच्या समोरच झाला. मग त्यावेळी पोलिसांनी फौजफाटा वापरून हा थांबवला का नाही ? असा एक प्रश्न उपस्थित झाला आहे या सगळ्या प्रकरणावर केदारलिंग देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांनी प्रकरणावर शांततेत तोडगा निघाल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं पण एका बाजूला पुजाऱ्यांचा आरोप आहे की परीते गावातल्या भाविकांनी माध्यपान करत खुल्लडबाजी केली तर गावकऱ्यांच म्हणण आहे की चुकून खोपऱ्याची वाटी आणि गुलाल पुजाऱ्यांना लागला त्यातून किरकोळ वाद झाला जो जागेवर मिटवण्यात आला पण त्यानंतर पुजाऱ्यांनी ठरवून गावातल्या तरुणांना मारहाण केली. मध्यपान केल्याचे अत्यंत चुकीचे आरोप केले काही स्थानिक पत्रकारांनी या प्रकरणाबद्दल परीते गावाची मानाची शासनकाठी असते त्यामुळे त्यांच्या गावातून बहुसंख्य भाविक ज्योतिबाला येतात मोठ्या जल्लोषात प्रदक्षिणा घालतात त्यावेळी ज्योतिबावर उदळायचा गुलाल खोबरं चुकून पुजाऱ्यांना लागलं आणि यावरून छोटासा वाद झाला जो जागेवर मिटला पण पुढच्या प्रदक्षिणे वेळी सुद्धा असाच वाद झाला जो नंतर वाढत गेला पुजाऱ्याना खोबर लागल्याने ते आक्रमक झाले पण पोलिसांची मदत न घेता त्यांनी थेट भाविकांना मारहाण करण्याचा प्रकार घडला जो बराच चिगळला अशी माहिती दिली पण या सगळ्यात पुजारी दमदाटी का करत होते? पुजारी पैसे घेतात भाविकांना नीट वागणूक देत नाहीत असे आरोप पुजाऱ्यांवर झालेत त्यातून पुजाऱ्यांनी बंद पाळला तर परीते गावातल्या भाविकांनी मोर्चा काढला. या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे त्यामुळे वाद इतका चिगळण्याच कारण काय आहे? कुणाच्या आरोपांमध्ये तथ्य आहे?हे आता चौकशी मधूनच समोर येणार आहे.....

व्हिडियो बातमी पाहण्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://youtube.com/shorts/dbsAojwQcq0?si=_ENWNaY6ITGUOlCr

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes