Breaking : bolt
पुरवठा आदेशावरून जावक क्रमांक आणि दिनांक गायबमुळे निविदा प्रक्रियेच्या उलट सुलट चर्चांना उधान.....!महाराष्ट्र थॅलेसेमियामुक्त करूया - राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरकागल तालुक्यातील चिमगावात रस्त्याचा वाद तापला, तहसीलदार कार्यालयासमोर दोन गटांची उपोषणेसमर्पण व कार्यतत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गमधील आरोग्य सेवा, महाडायलिसिस अंतर्गत सेवांचा आढावाआरोग्य मंत्र्यांच्या धडाकेबाज कामाला अधिकाऱ्यांचा 'खो', अंतर्गत राजकारणाने मंत्र्यांचा जिल्हा होतोय बदनाम...?बच्चूभाऊ कडूंना आमदारकी मिळणार की फक्त फुगवठा ? पक्ष विलीन करणार का ? सार्वजनिक आरोग्य मंत्रीपद.......?शासनाच्या यादीवर नसणाऱ्या उपकरणांना तांत्रिक मान्यता देणाऱ्या उपसंचलकांच्या विभागीय चौकशीसाठी आज आयुक्तांना निवेदन सादरजिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. वाडीकर, डॉ. देशमुख यांच्यासह तिघे निलंबित पण ही शासनासाठी धोक्याची घंटा.....नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख निलंबित..!गरिबांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी मागितली लाच, बिडकीनमध्ये एसीबीचा 'ट्रॅप', बडा वैद्यकीय अधिकारी गजाआड

जाहिरात

 

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अंगात देवी आल्याचे सोंग करणाऱ्या महिलेचा केला भांडाफोड

schedule30 Mar 26 person by visibility 157 categoryसिंधुदुर्ग

मालवण वार्ताहर - मालवण शहरातील एका भरवस्तीत एक स्त्री अनेक वर्ष आपल्या अंगात दुर्गामाता, लक्ष्मी माता, चंडिका माता, फटकीदेवी, रेणुका माता, इत्यादी विविध सात देवी विविध वाराला काढून आपल्यात अलौकिक शक्ती असल्याचे सांगून लोकांना फसवत होती. त्याबद्दल अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे अर्जाद्वारे तक्रार प्राप्त झाली असून त्या तक्रारीत भूत, भविष्य, वर्तमान काळात घडणाऱ्या घटना सांगून अनेकांचे प्रश्न मिटवीत होती असे सांगण्यात आले. त्यासाठी पैशांची मागणी करीत होती. तिने आपल्या सख्या भावजयीवर आपल्यावर तिने करणी केल्याचा आरोप केला आहे. तिच्या करणीमुळे तिच्या स्वतः नवऱ्याला बरे नसते ते सारखे आजारी असतात. आपली भावजय आपल्यावर करणी करते असे वाडीतील सर्वांना सांगून तिची बदनामी करून तिला नेहमी मानसिक त्रास देत होती असे नमूद केले आहे. त्यामुळे तिच्या भावजयीने तिच्या त्रासाला कंटाळून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांच्याकडे लेखी अर्ज देऊन स्वतःची भावजय अंगात देवी काढते. तिच्या नवऱ्याला बरे नसते. पण मी तिच्यावर करणी केली म्हणून तिच्या नवऱ्याला बरे नसते असे वाडीतील सर्वांना सांगून माझे जगणे मुश्कील केले आहे . आपल्या भावजय पासून होणाऱ्या त्रासापासून आम्हाला न्याय द्यावा व होणारा त्रास कमी करावा असा अर्ज दिला होता. या अर्जाच्या आधारे विजय चौकेकर यांनी आपल्या सोबत महिला संघटिका उज्वला येळावीकर, जिल्हा सरचिटणीस अजित कानशिडे, युवा संघटक युगांत चव्हाण यांना घेऊन सदर देवीकडे जाऊन अनेक प्रश्न विचारले. यामध्ये चौकेकर यांच्या मुलाचे चार वर्षापूर्वी अपघाती निधन झालेले असतानाही माझ्या मुलाचे लग्न होऊन चार पाच वर्षा झाली तरी मूल होत नाही. आणि सून नांदायला येत नाही.असे विचारले.तर उज्ज्वला येळावीकर यांनी आपल्या मुलीचे लग्न ठरले होते आणि लग्नात केलेले दागिने चोरीस गेले ते कधी मिळतील असे विचारले.तर युगांत चव्हाण आपल्या आई-वडिलांना उलट बोलतो .तर कधी कधी आई वडिलांच्या अंगावर धावून जातो .असे कशामुळे तो वागतो असे विचारले .त्यावेळी विजय चौकेकर यांच्या सुनेला संबंध बाधा आणि करणी केलेली असल्याने ती काढल्याशिवाय तिला मूल होणार नाही. तिची करणी मी तिला घेऊन आल्यावर काढू शकते. जे दागिणे चोरीस गेले ते नवऱ्या मुलानेच दागिने चोरले असून मी माझी शक्ती येथून सोडते. तो पंधरा दिवसात दागिने आणून देईल .युगांत चव्हाण याला दोन भूताने झपाटले असून त्याची भूते आज मी उतरली असती पण त्याने काळे टिशर्ट घातल्याने माझी शक्ती चालणार नाही. त्यासाठी मी सांगते त्याप्रमाणे थोडे उपाय करावेत व पुन्हा मुलीला व मुलाला घेऊन यावे . तिने सांगितले त्याप्रमाणे सगळे केल्यानंतर पुन्हा चौकेकर यांनी त्या देवीकडे एक दुसरी मुलगी सून म्हणून घेऊन गेले . त्यावेळी युगांत चव्हाण यांच्या अंगावरील भूत उतरवण्यासाठी त्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर स्वतःच्या शरीराचा पूर्ण दाब देऊन त्या पायाला इजा होईल असे वर्तन केले .तर सून म्हणून आलेल्या मुलीच्या केसाला धरून संबंध उतरवण्यासाठी तीला गोल गोल फिरविले .चोराने अद्यापही दागिने आणून दिले नसल्याचे सांगताच मी माझी पुन्हा शक्ती येथून सोडते .तो दागिणे पंधरा दिवसात आणून देईल असे अघोरी उपाय केले.तिसऱ्या वेळी तिच्या घरी जाऊन आपण प्रत्यक्ष कोण आहोत याची संपूर्ण माहिती दिली . आपण सांगितल्याप्रमाणे अद्यापही चोराने दागिणे परत केले नाहीत .तसेच आपल्या मुलाचं चार वर्षापूर्वीच अपघाती निधन झाल्याचे सांगून मृत व्यक्तीला आणण कसे काय मूल करून देणार ? युगांत चव्हाण हा चार्टर अकाऊंटर असून त्याला कोणताही त्रास नाही . तरी त्याची तुम्ही दोन भूते उतरविण्याच्या बहाण्याने त्याला शारीरिक इजा केली .करणी आणि संमंध बाधा उतरविण्याच्या बहाण्याने मूलीला शारीरिक त्रास दिलात . एळावीकर यांच्या घरात कोणतीही चोरी झालेली नाही तर तिच्या मुलीचे अतिशय वाजत गाजत लग्न झालेले आहे .करणी करते म्हणून सांगून आपण आपल्या भावजयीला मानसिक त्रास दिलात .जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गत आपण कोणकोणत्या कलमांचे उल्लंघन केले आणि आपणास किती काळ सजा होऊ शकते तसे किती दंड होऊ शकतो याची कल्पना तिला दिली . आपण केलेल्या कृत्यांची कल्पना येतातच तिचे यजमान व ती गयावया करू लागली .आपल्याकडून घडलेली कृत्य कशी चुकीची आहेत त्याची जाणीव झाली . माझ्या अंगात कोणत्याही देवीचा संचार होत नसून मला कोणतीही अलौकिक शक्ती प्राप्त नाही . मी माझ्या पोटापाण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी अंगात विविध प्रकारच्या देवी येत असल्याचे सोंग करत होते .पण आपण मला एकदा संधी दिल्यास मी प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करेन पण कृपया माझ्यावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करू नका अशी लेखी विनंती केली .तिची लहान मुले पाहता आईवर केस दाखल झाली तर मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो याचा विचार करून तसेच तिचा नवऱ्या आजारी असतो त्याचेवर मानसिक आघात होऊ शकतो .त्यामुळे तिच्या विरोधात कोणतीही तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल न करता तिचा समक्ष माफीनामा लिहून घेऊन या पुढे माझ्या अंगात कोणतीही देवी आणणार नाही अथवा बाहेर कोणाचाही घरी देवी अंगात काढून त्यांचे प्रश्न सोडविणार नाही असे लेखी लिहून घेऊन माणुसकीच्या दृष्टीकोनातून तीला चांगले वागण्याची समज देण्यात आली आणि पुढे अशी तक्रार आल्यास मात्र गुन्हा नक्कीच दाखल करू असे सांगितले.

        जर कोणत्याही व्यक्ती अथवा स्त्रीच्या अंगात असा कोणताही दिव्य संचार होत असेल तर आमच्या प्रश्नाची अचूक उत्तरे दिल्यास अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ८० लाख रुपये बक्षिस देऊ शकते .अशा व्यक्तीने समितीचे ऐंशी लाखाचे बक्षिसाचे आवाहन स्वीकारावे असे आवाहन विजय चौकेकर यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केले आहे .हि भांडाफोड करण्यास अध्यक्ष ॲड . राजिव बिले यांनी मार्गदर्शन केले .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes