Breaking : bolt
कोल्हापूर जिल्हा आरोग्य विभागाच्या विरोधात मुंबई आरोग्य भवनच्या दारात रासपचा उग्र आंदोलनाचा इशाराआमदार डॉ राहुल प्रकाश आवाडे यांच्यामुळे प्रभागातील विकास कामांना गतीशिळफाटा येथील रस्ता रुंदीकरणासाठी "आप"ने पुकारले उपोषणाचे हत्यार, १५ मे ला डॉ. पठाण बसणार उपोषणालाराजकपूर पुतळ्यासमोरील रंकाळा गार्डमध्ये मृत माशांचा खच, मासे कुजल्याने परिसरात दुर्गंधीआरोग्य विभागाची लक्तरे टांगली वेशीवर, सोलापूर मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखलबोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा, वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र नसतानाही छोटा दवाखाना सुरु!सिव्हील हॉस्पीटल मिरज येथून अपहरण झालेले ३ दिवसाचे बाळ ४८ तासाचे आत हस्तगतआरोग्यचे आयुक्त अँक्शनमोडवर, मनपाचे आरोग्य अधिकारी यांची बदली आणि चौकशीचे आदेशडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलंच पत्रकारी स्वरूपाचं लेखन 'मूकनायक'च्या पहिल्या अंकात....'मॅनेज' निविदेचा प्लॅन उधळला ? आता दोषींच्या चौकशीअंती निलंबनाची मागणी

जाहिरात

 

विजय चौकेकर, वंदना करंबेळकरांना बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे पुरस्कार प्रदान

schedule19 Feb 25 person by visibility 453 categoryसिंधुदुर्ग

सिमंतीनी मयेकर (सिंधुदुर्ग) - बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा यांच्यावतीने चौके (ता. मालवण) गावचे सुपुत्र, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय चौकेकर यांना संजय नाईक यांचे स्मृतिप्रित्यर्थ आदर्श शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार तर बापूभाई शिरोडकर स्मृती आदर्श समाजसेविका पुरस्कार निरामय केंद्र कोलगावच्या सचिव श्रीमती वंदना करंबेळकर यांना आज शिवजयंती दिनी बुधवारी (ता. १९) दुपारी ३ वाजता केंद्र शाळा कट्टा क्रमांक १ या सभागृहात मान्यवरांचे उपस्थित पुरस्कार प्रदान करण्यात आला.
              मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक, पेंडूरचे माजी सरपंच व कट्टा दशक्रोशीतील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व संजय नाईक यांचे अलीकडेच अकाली निधन झाले. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदर्श शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार देण्याचे निश्चित केले होते. तो पुरस्कार चौके गावचे सुपुत्र, माजी मुख्याध्यापक विजय चौकेकर यांना प्रदान करण्यात आला आहे. चौकेकर यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्ह्यातील अनेक शाळात काम केले आहे. उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती समाज मालवण तालुक्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. सध्या ते सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्या मालवण तालुक्याचे अध्यक्ष आहेत. त्या माध्यमातून ते अनेक उपक्रम राबवत असतात.
सध्या त्यांनी जादूटोणा विरोधी कायदा २०१३ च्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी वाहून घेतले आहे. सिधुदुर्गातील अनेक गावे, शाळा महाविद्यालये अशा ठिकाणी अनेक शिबीरे ते या कायद्याची माहिती देण्यासाठी जातात व प्रात्यक्षिके दाखवतात. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी संजय नाईक स्मृति आदर्श शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
           बॅ.नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्यावतीने बापूभाई शिरोडकर स्मृति आदर्श समाजसेविका पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो. यावर्षी निरामय केंद्र कोलगावच्या सचिव श्रीमती वंदना करंबेळकर यांना तो मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्या एका खासगी बँकेच्या माजी कर्मचारी असून समाज सेवेसाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. कर्मचारी पुरस्कार ही त्यांना मिळाला आहे. निरामय केंद्राच्या माध्यमातून त्या गेली ३० वर्ष सामाजिक सेवेत आहेत. ही संस्था प्रामुख्याने आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रात काम करते. आर्थिक दृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्याना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. गेली ३० वर्ष त्या सेवा करत आहेत. त्यांचे साहित्य क्षेत्रातही मोठे योगदान आहे.
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त तेलुगु लेखिका श्रीमती होल्गा यांच्या तीन पुस्तकांचे अनुवाद त्यांनी केले आहेत. त्याशिवाय व्यंकटेश राजन यांच्या बोधशाला या अनुभव कथनाचा अनुवाद प्रकाशित केला आहे. याची दखल घेवून हा पुरस्कार देण्यात आला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes