आरोग्य विभागाची प्रतिष्ठा धोक्यात, जिल्हा लेखा व्यवस्थापकांचा कारनामा, फौजदारी दाखल करण्याचे कारण नेमकं आहे काय ?
schedule05 Mar 25
person by
visibility 115
categoryकोल्हापूर
संजय पोवार (वाईकर) - कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एक गंभीर प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये जिल्हा लेखा व्यवस्थापकांच्या कार्यक्षमतेवर आणि उद्देशांवर संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणामुळे आरोग्य विभागाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे त्यामुळे एका तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पद आणि जिल्हा सोडावा लागला होता.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आर्थिक देवाणघेवाणीच्या चर्चा आणि संशयामुळे गेल्या काही काळापासून वाद निर्माण झाला आहे. या संशयाच्या पार्श्वभूमीवर काही निविदांमध्ये जिल्हा लेखा व्यवस्थापक यांनी मुद्दाम गंभीर त्रुटी ठेवल्याचे नुकत्याच आलेल्या नामांकित वृत्तपत्रातील बातमीने उघड झाले आहे. या त्रुटींचा फायदा घेऊन चुकीच्या पुरवठाधारकांना करोडो रुपयांचे ऑर्डर देण्यात आली, ज्यामुळे आरोग्य खात्याची प्रतिष्ठा खाली आली आहे. आणि आर्थिक देवाण घेवाण झाल्याचा संशय बळावला आहे.
जिल्हा लेखा व्यवस्थापकांच्या कार्यक्षमतेवर आणि उद्देशांवर संशय निर्माण झाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सांगणकाची निविदा पूर्ण होऊ शकली नाही, ज्यामुळे आरोग्य विभागाच्या कार्यक्षेत्रात अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी निविदा पुन्हा नव्याने करण्याच्या सूचना जानेवारी 2025 मध्ये जिल्हा लेखा व्यवस्थापक यांना दिल्या होत्या, परंतु त्यावर कोणतीही टिप्पणी न ठेवता मुदतवाढ दिली जात होती. यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख जिल्हा लेखा व्यवस्थापक आहेत की काय यावर विनोदी चर्चा आरोग्य विभागात सुरू झाली आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील हे प्रकरण आरोग्य सेवांच्या दर्जावर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. या प्रकरणाची तीव्र चौकशी करून जिल्हा लेखा व्यवस्थापक दोषी आढळल्यास त्याच्यावर फौजदारी दाखल करण्याची मागणी होत असून दोषींवर कारवाई करणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाची प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पारदर्शकता आणि जबाबदारी यांचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. अन्यथा जोपर्यंत फौंजदारी होत नाही तोपर्यंत कोणतीही निविदा फ्लॅश करू देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.