Breaking : bolt
कोल्हापूर जिल्हा आरोग्य विभागाच्या विरोधात मुंबई आरोग्य भवनच्या दारात रासपचा उग्र आंदोलनाचा इशाराआमदार डॉ राहुल प्रकाश आवाडे यांच्यामुळे प्रभागातील विकास कामांना गतीशिळफाटा येथील रस्ता रुंदीकरणासाठी "आप"ने पुकारले उपोषणाचे हत्यार, १५ मे ला डॉ. पठाण बसणार उपोषणालाराजकपूर पुतळ्यासमोरील रंकाळा गार्डमध्ये मृत माशांचा खच, मासे कुजल्याने परिसरात दुर्गंधीआरोग्य विभागाची लक्तरे टांगली वेशीवर, सोलापूर मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखलबोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा, वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र नसतानाही छोटा दवाखाना सुरु!सिव्हील हॉस्पीटल मिरज येथून अपहरण झालेले ३ दिवसाचे बाळ ४८ तासाचे आत हस्तगतआरोग्यचे आयुक्त अँक्शनमोडवर, मनपाचे आरोग्य अधिकारी यांची बदली आणि चौकशीचे आदेशडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलंच पत्रकारी स्वरूपाचं लेखन 'मूकनायक'च्या पहिल्या अंकात....'मॅनेज' निविदेचा प्लॅन उधळला ? आता दोषींच्या चौकशीअंती निलंबनाची मागणी

जाहिरात

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 14 नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश

schedule31 Oct 24 person by visibility 98 categoryसिंधुदुर्ग

मकरंद परब (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 31 ऑक्टोबर 2024 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
            जिल्ह्यात विधानसभा निवडणुक २०२४ च्या राजकीय पक्षाच्या बैठका, तसेच वैयक्तीक व सामाईक मागणीकरीता उपोषणे मोर्चा, संप, निदर्शने, रस्ता रोको वगैरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येते अशावेळी आंदोलनकर्ते यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 तरी विधानसभा निवडणुक २०२४ करीता जाहीर सभा, कॉर्नर सभा, कार्यकर्ता बैठक, मेळावे, सण उत्सव, तसेच होणारी उपोषणे, मोर्चा, संप, निदर्शने, रस्ता रोको या सारख्या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोठेही अनुचित प्रकार घडू नये. जिल्ह्यातील जातीय सलोखा कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्याच्या संपुर्ण भूभागात मनाई आदेश लागू करण्यात येत आहे.
वरील कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात पुढील कृत्य करण्यास मनाई करण्यात येत आहे.
कलम ३७ (१) नुसार
१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी
   वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे.
२) अंग भाजून टाकणार पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे.
३) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा
      करणे किंवा तयार करणे.
४) व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे समाजाच्या
        भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.)
५) सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे.
६) सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग
       आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.
कलम ३७(३) नुसार
१) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूका
काढणे व सभा घेणे.
   २) हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, संबधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे. अशा व्यक्तींना आणि लग्न, धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही .
वरील कालावधीतील मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes