आकाश भारतीय (रायगड) - अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातून प्रसारित होणाऱ्या निर्भीड पोलीस टाइम्स वृत्तसंस्थेच्या शिव संस्कार दिनदर्शिकेचे नुकतेच किल्ले रायगड येथे शिवभक्तांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी निर्भीड पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक सुशांत पोवार, उपसंपादक युवराज खराडे, प्रशांत पोवार, संस्कार जितकर, शुभम बुजरे इत्यादींसह पर्यटक म्हणून आलेले शिवभक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
शिव संस्कार दिनदर्शिका हि महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मिळ आणि महत्वपूर्ण माहितीमुळे अग्रगण्य म्हणून ओळखली जाते. निर्भीड पोलीस टाइम्सचे आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. निर्भीड पोलीस टाइम्सने जैव वैद्यकीय कचरा आणि संसर्ग यावर केलेल्या निर्भीड वार्तांकनाची दखल महाराष्ट्राचे पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनात वादळी चर्चा झाली असून तत्काळ दोषींवर कडक कायदेशीर कारवाई झाल्याचे नागरिक साक्षीदार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत शासकीय अधिकारी आणि डॉक्टर्स यांचा विश्वास अल्पावधीत संपादन केला आहे.
शिव संस्कार दिनदर्शिकेत छत्रपती शिवरायांचा इतिहासातील प्रत्येक दिवसाचे महत्व तारखांच्या रखाण्यात प्रकाशित केले असून त्यामुळे प्रत्येक दिवशी छत्रपती शिवरायांनी केलेल्या पराक्रमाची आठवण डोळ्यासमोर दिनदर्शिकेच्या माध्यमातून राहणार आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय दुर्मिळ अशा माहितीचा खजाना ही प्रकाशित केल्याने निर्भीड पोलीस टाइम्सची दिनदर्शिका संग्रही आणि संदर्भीय राहणार यात शंका नसल्याचे मुख्य संपादक सुशांत पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. शिव संस्कार दिनदर्शिका २०२५ ही वृत्तपत्र विक्रेते स्टोलवर उपलब्ध करून देण्यात आली असून कोणाला ऑनलाईन हवी असल्यास त्यांनी ७३८५९३७९२१ या Whatsaap क्रमांकावर दिनदर्शिकेचे स्वागत मूल्य ५५ रुपये भरून कुरिअरद्वारे मागवू शकता असे निर्भीड पोलीस टाइम्स कडून सांगण्यात आले आहे.