मायक्रोन्युट्रीयंट सप्लीमेंट ग्रॅन्युल्स प्रोटीनची निविदा म्हणजे कोंबडी आधी कि अंडे ?
schedule11 Mar 25 person by visibility 179 categoryमहाराष्ट्र
सुशांत पोवार (रत्नागिरी) - रत्नागिरी जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभाग वेगळ्याच एका प्रकरणाने चर्चेत आला आहे. जिल्हा योजनेतून सन २०२२-२०२३ अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर महिला व स्तनदा मातांना (WHO-UNICEF-WFP Formula) नुसार मायक्रोन्युट्रीयंट सप्लीमेंट ग्रॅन्युल्स पुरवठाचे काम एका ठेकेदाराल देण्यात आले.सदरचे काम जवळपास ४ कोटी ३८ लाख २५ हजार ६०० रुपयांचे होते. निविदा प्रक्रिया राबविताना काही ठेकेदारांनी लेखी तक्रारी दिल्या पण त्या तक्रारीला प्रशासनाने अगदी शिताफीने उत्तर देऊन केराची टोपली दाखवल्याने निविदा प्रक्रियेमध्ये कोणतीही स्पर्धा झाली नाही त्यामुळे झालेला पुरवठाबाबत काही शंका उपस्थित झाल्या आहे. पुरवठाधारकांच्या तक्रारी इतक्या गंभीर आहेत कि निर्भीड पोलीस टाइम्सने याची वृत्तमालिका प्रसारित करण्यासाठी पालघर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, रायगड, यवतमाळ आणि ठाणे येथे महिला व बालकल्याण विभाग यांचेशी संपर्क साधून माहिती गोळा केली.