वृत्तसंस्थांच्या नावे अपप्रचार व महिलांच्या थठ्ठा, लेखी तक्रारी आल्यास पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल
schedule04 Mar 25
person by
visibility 114
categoryक्राइम न्यूजकोल्हापूर
सारंग डवरी (कोल्हापूर) - निर्भीड पोलीस टाइम्स ही वृत्तसंस्था अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरलेली न्युज पोर्टल आहे. मात्र, अलिकडेच या वृत्तसंस्थेच्या नावे काही अनधिकृत व्यक्तींनी अपप्रचार आणि फसवणूक करण्याच्या तक्रारी तोंडी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींमध्ये शासकीय पुरवठादारांना त्यांच्या खाजगी वृत्तवाहिन्यांना बातम्या लावून त्यांच्याच व्हाट्सअपवर आक्षेपार्ह मॅसेज पाठवून नंतर ते डिलीट करण्याच्या घटनांचा समावेश आहे. त्यामध्ये पुरवठादरांनी निर्भीड पोलीस टाइम्सचं त्यामध्ये आहे असा समज करून घेतल्याने काही ठिकाणी वादाचे प्रसंग घडत आहेत. तसेच, काही शासकीय अधिकाऱ्यांना वृत्तसंस्थेच्या बदनामीसाठी कॉल करून चुकीचे अपप्रचार केल्याच्या तोंडी तक्रारी सुद्धा प्राप्त झाल्या आहेत.
निर्भीड पोलीस टाइम्स च्या संपादकांनी अशा तक्रारी लेखी स्वरूपात आल्यास त्याविरोधात पोलीस अधीक्षक यांना तत्काळ कारवाई संदर्भात भेटणार असल्याचे सांगितले आहे. निर्भीड पोलीस टाइम्समध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या घरातील काही महिलांच्या विषयी त्यांच्या व्यंगावर आक्षेपार्य विधाने केल्याचे सुद्धा काहींनी कळविले आहे. सदरची विधाने विनयभंग सारख्या गंभीर गुन्हे दाखल होणारी असून याविषयी कॉल रेकॉर्डिंग सारखे पुरावे प्राप्त झाल्यास तत्काळ गुन्हेगाराला अटक करण्याची मागणी ही केली जाणार आहे.
निर्भीड पोलीस टाइम्स सारख्या वृत्तसंस्थांना अशा अनधिकृत कारवायांपासून संरक्षण मिळायला हवे आणि वेळीच अशा गुन्हेगारांना चाप बसला पाहिजे त्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय हा योग्य आहे असे संपदाकांनी कळविले आहे. तसेच पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून अशा गुन्हेगारांवर त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे. वृत्तसंस्थांच्या नावे होणारे अपप्रचार आणि फसवणूक ही गंभीर बाब आहे आणि त्याविरोधात कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
अलिकडच्या काळात अशा प्रकारच्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. या तक्रारींमध्ये आर्थिक फसवणूक आणि अपप्रचार यांचा समावेश आहे. निर्भीड पोलीस टाइम्स सारख्या वृत्तसंस्थांनी या तक्रारींचा प्रतिसाद देताना पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे. ही कारवाई नेमकी वेळेवर होणे आवश्यक आहे जेणेकरून अशा गुन्ह्यांना आळा बसेल. नागरिकांना अशा अनधिकृत कारवायांपासून सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे. वृत्तसंस्थांच्या नावे कोणत्याही प्रकारची आर्थिक मागणी किंवा अपप्रचार करणारे व्यक्तींपासून सावध राहावे. अशा व्यक्तींविरोधात त्वरित पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करावी असे आवाहन ही करण्यात आले आहे.