Breaking : bolt
कागल भूमी अभिलेख कार्यालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर, शासनाच्या जमिनींची खाजगीकरणाची खिरापत ?वेळीच हस्तक्षेप केला गेला नाही तर राज्यातील आरोग्य खाते होईल भ्रष्टाचाराचे कुरणकोल्हापूर जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील "शासकीय जमिनींचा महाघोटाळा" उघडकीस ? लवकरच सविस्तर वृत्त.......औषधांसाठी हमीचे बंधन पण काही पुरवठादारांकडून दराची स्पर्धा टाळण्यासाठी सहभागी पुंरवठादारांना धमक्याचे सूत्र ?परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीतचं, यदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका !‘लातूर ग्रंथोत्सव २०२४’चे दिमाखदार उद्घाटनसांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागूसिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या पालकत्वाचे दाखले वाटपसिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची तक्रार निवारण सभा प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेलाबायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत पुणे येथे प्रशिक्षण कार्यशाळा

जाहिरात

 

नाना पटोलेंना मुख्यमंत्री बनवायचा असेल तर राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलं पाहिजे - संजय राऊत

schedule21 Nov 24 person by visibility 288 categoryराजकीय घडामोडी

वृत्तसंस्था - महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. काल मतदान प्रक्रिया पार पडली. शनिवारी 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. मतदानानंतर आज आणि उद्या असे दोन दिवस आहेत. त्यामुळे सरकार कुणाचं होणार? सत्तेत कोण असणार? राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याची महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेऊ, असं महाविकास आघाडी आणि महायुतीने जाहीर केलं आहे. मात्र आज सकाळी माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे नेते, संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. संजय राऊतांनी काँग्रेसच्या बड्या नेत्याचं यावेळी नाव घेतलं.

                              महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यास कोण राज्याचा मुख्यमंत्री होणार? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आलं. तेव्हा निकालाच्या दिवशी 23 तारखेला 10. 30 ते 11.00 वाजता मी सांगेल महाविकास आघाडीचा कोण मुख्यमंत्री असेल ते…, असं संजय राऊत म्हणाले. तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे. याबाबत विचारलं असता. नाना पटोले यांना मुख्यमंत्री बनवायचा असेल तर राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणालेत. महाविकास आघाडी 26 तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापन करण्याचा दावा करू शकते. मविआला १६०-१६५ जागा एकत्रित निवडून येत आहेत. त्यामुळे एक्झिट पोल वरती कोणीही विश्वास ठेवू नये. आम्ही २३ तारखेला ही सत्तेवर दावा करू, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

                  काल मतदान झाल्यानंतर काल संध्याकाळी विविध एजन्सीचे एक्झिट पोल आले आहेत. यातील काही पोलमध्ये महायुती आघाडीवर दाखवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी महाविकास आघाडीकडे कल असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलीय. एक्झिट पोल हा एक फ्रॉड आहे. हरियाणामध्ये काँग्रेस ६० च्या वर जागा येईल पण काय झाले आपण पाहिले. लोकसभेला ४०० पार पण काय झाले आपण पाहिलं. लोकांनी मतदान केले ते गुप्त असतं. काही लोक गोंधळ वाढवन्याचा प्रयत्न करत आहेत, असं म्हणत राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes