विधानसभेची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी, यंत्रणा सज्ज
schedule22 Nov 24
person by
visibility 99
categoryकोल्हापूर
संजय पोवार - वाईकर (कोल्हापूर) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून या निवडणुकीची मतमोजणी, शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होणार आहे. जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी आज दिली आहे.
जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील मतमोजणी खालील ठिकाणी होणार आहे.
271 चंदगड - पॅव्हेलियन हॉल गांधीनगर, नगरपरिषद, गडहिंग्लज
272 राधानगरी - तालुका क्रीडा संकुल, जवाहर बाल भवन, गारगोटी
273 कागल - जवाहर नवोदय विद्यालय, सांगाव रोड, कागल
274 कोल्हापूर दक्षिण - व्ही.टी. पाटील सभागृह, ताराराणी विद्यापीठ, राजारामपुरी, कोल्हापूर
275 करवीर – शासकीय धान्य गोदाम क्र. D, रमणमळा कसबा बावडा, कोल्हापूर
276 कोल्हापूर उत्तर - शासकीय धान्य गोदाम क्र. A, रमणमळा कसबा बावडा, कोल्हापूर
277 शाहूवाडी - जुने शासकीय धान्य गोदाम-पश्चिमेकडील बाजू भाग-ब, तहसिल कार्यालया शेजारी, शाहूवाडी
278 हातकणंगले - शासकीय धान्य गोदाम नंबर 2, हातकणंगले.
279 इचलकरंजी - राजीव गांधी सांस्कृतिक भवन, कापड मार्केटसमोर, इचलकरंजी
280 शिरोळ - मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील आवारामध्ये (तळ मजला)