Breaking : bolt
कागल भूमी अभिलेख कार्यालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर, शासनाच्या जमिनींची खाजगीकरणाची खिरापत ?वेळीच हस्तक्षेप केला गेला नाही तर राज्यातील आरोग्य खाते होईल भ्रष्टाचाराचे कुरणकोल्हापूर जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील "शासकीय जमिनींचा महाघोटाळा" उघडकीस ? लवकरच सविस्तर वृत्त.......औषधांसाठी हमीचे बंधन पण काही पुरवठादारांकडून दराची स्पर्धा टाळण्यासाठी सहभागी पुंरवठादारांना धमक्याचे सूत्र ?परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीतचं, यदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका !‘लातूर ग्रंथोत्सव २०२४’चे दिमाखदार उद्घाटनसांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागूसिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या पालकत्वाचे दाखले वाटपसिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची तक्रार निवारण सभा प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेलाबायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत पुणे येथे प्रशिक्षण कार्यशाळा

जाहिरात

 

कोलकता महिला डॉक्टर हत्त्या प्रकरणात नवीन काय काय घडले ? आणि यावरून राजकीय वातावरण कसे तापलंय ? यावर निर्भीड संपादकीय नजर....

schedule17 Aug 24 person by visibility 273 categoryसंपादकीय

सुशांत पोवार (संपादकीय) - कोलकता महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणाला आता ८ दिवस पूर्ण झाली आहेत. सीबीआयकडे हे प्रकरण सोपवण्यात आल्यानंतर ह्या प्रकरणातला मुख्य आरोपी संजय रॉयसह हॉस्पिटलमधील इतर डॉक्टरांची हि चौकशी केली जात आहे. सामुहिक अत्याचार करून महिला डॉक्टरची हत्या करण्यात आल्याचे आरोप तिच्या घरचे आणि डॉक्टरांकडून केले जात आहेत. गेल्या आठ दिवसात पश्चिम बंगालसह महाराष्ट्र, दिल्ली आणि इतर राज्यासह डॉक्टरांनी हि आक्रमक पवित्रा घेतला आहे. यानंतर आता इंडियन मेडिकल असोसिएशनकडून २४ तासांच्या संपाची हि घोषणा करण्यात आली आहे. एकीकडे हे सगळे घडत असतानाच १४ ऑगस्टच्या रात्री आरजी कर हॉस्पिटलमध्ये जमावाने केलेल्या तोडफोडीनंतर वातावरण चांगलंच चिघळलंय. तोडफोड करणारा जमाव हा आंदोलनकर्त्या जमावाचा नसून ह्यामध्ये राजकीय पक्षांचा हात असल्याचे आरोप सत्ताधारी आणि विरोधकांकडून केले जात आहेत. दरम्यान महिला डॉक्टर हत्त्या प्रकरणी स्वतः मुख्यमंत्री म्हणून ममता बॅॅनर्जी यांच्या कडून हि रॅॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या बाबत पोलिसांकडून हि चौकशी केली जात आहे. कोलकता महिला डॉक्टर हत्त्या प्रकरणात नवीन काय काय घडले ? आणि यावरून राजकीय वातावरण कसे तापलय ? याचीच माहिती या संपादकीय मधून मांडणार आहे.
              ८ ऑगस्टच्या मध्यरात्री कोलकताच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्त्या करण्यात आल्याचे समोर आले. त्यांनतर या प्रकरणातला मुख्य आरोपी संजय रॉयला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात पश्चिम बंगाल सरकार आणि पोलिसांवर आरोप करण्यात आल्या नंतर उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले. त्यानुसार सीबीआयने या प्रकरणातला मुख्य आरोपी संजय रॉयला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार महिलेच्या शरीरात १५० मिलीग्रॅॅम वीर्य आढळले गेल्यामुळे सामुहिक अत्याचार करून तिची हत्त्या केल्याचा आरोप तिच्या घरचे आणि आंदोलनकर्त्या डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणातल्या सगळ्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे सीबीआयने आता तपासाला वेग दिला आहे. ८ ऑगस्टच्या रात्री पिडीतेसोबत नाइट शिफ्टला असणाऱ्या ५ ट्रेनी डॉक्टरांसोबतच मेडिकल कॉलेजचे माजी सुपरिटेंडंट, प्रिन्सिपल, मेडिसिन आणि चेस्ट डीपार्टमेंटचे प्रमुख अशा ९ जणांची सीबीआयने चौकशी केली आहे. तसेच हॉस्पिटलच्या इतर स्टाफची हि चौकशी करण्यात आली आहे. सीबीआयची टीम सीएफएसएलच्या माध्यमातून पिडीतेचे कॉल रेकॉर्ड,चॅॅट आणि सोशल मिडीला अकौंट हि तपासण्यात येत आहेत. तसेच ८ ऑगस्टच्या रात्री नेमके काय घडले असावे याचा तपास करण्यासाठी सीबीआयकडून सीन क्रियेट करण्याचा प्रयत्न हि केला जातोय. सीबीआयकसून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून या सगळ्या तपासात सीबीआयच्या हाती काय लागणार ? हा सामुहिक आत्याचाराचा प्रकार आहे काय ? याची उत्तरे मिळणे शक्य होणार आहे.
               दरम्यान या प्रकरणानंतर पिडीतेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत हि देऊ केली गेली पण तिच्या वडिलांनी हि मदत नाकारली. मला फक्त न्याय हवा आहे. बाकी काही नको. मी जर हे पैसे स्वीकारले तर माझ्या मुलीला दुख होईल त्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा करण्याशिवाय मला दुसरे काहीही नको. असे तिच्या वडिलांनी म्हंटले आहे. महिला डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी आरजी करचे विद्यार्थी आणि डॉक्टरांसोबतच देशभरातल्या डॉक्टरांनी हि आंदोलन छेडले. पण या आंदोलनाला गालबोट लागल्याची घटना १४ ऑगस्टच्या रात्री घडली. मध्यरात्री ४० जणांचा जमाव आंदोलनकर्त्यांचा मुखवटा घालून हॉस्पिटलच्या आवारात घुसले आणि त्यांनी आंदोलनाच्या मंचासह हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली असा आरोप आता केले जातोय. या जमावाने कट्या. दगड, आणि रॉडने हॉस्पिटलचा ओपीडी विभाग इमर्जन्सी वॉर्ड, नर्सिंग स्टेशन, आणि मेडिकलची तोडफोड केली. तसेच हल्लेखोरांनी परिसरातील सीसीटीव्ही सुद्धा फोडून टाकले. पोलिसांवर हि जमावाकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये १५ पोलीस जखमी झाले. यानंतर पोलिसांनी अश्रू धुराचा वापर करून जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी या तोडफोडी मागचे खरे चेहरे समोर आणण्यासाठी नागरिकांना हि आवाहन केले. या तोडफोड प्रकरणात आतापर्यंत १९ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना २२ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण या हल्ल्यानंतर बंगालमधील राजकीय वातावरण चांगलंच तपाल्याचे दिसून येत आहे. या हल्ल्यानंतर भाजप नेते सुवेन्धू अधिकारी यांनी या हल्ल्यामागे तृणमूल कॉंग्रेसचा हात असल्याचे आरोप केले आहेत. ममता बॅॅनर्जी यांनीच गुंड पाठवून हा हल्ला घडवून आणला, या गुंडांना आंदोलनकर्त्यांचे मुखवटे घालून हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्याचा आणि आंदोलनकर्त्या डॉक्टरांना बदनाम करण्याचा ममता यांचा कट असल्याचा आरोप अधिकारी यांच्या कडून करण्यात आला. दुसरीकडे भाजपकडून आरोप होत असताना या हल्ल्याप्रकरणी ममता बॅॅनर्जी यांनी मात्र विरोधकांवर निशाना साधला आहे. या हल्ल्यात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचा काहीहि दोष नाही हे सगळे विरोधकांनी घडवून आणले आहे मी काही व्हिडीओ बघितले त्यामध्ये काही लोक राष्ट्रध्वज घेऊन तर काही लोक गुलाल आणि पांढरे झेंडे घेऊन हॉस्पिटलची तोडफोड करत असल्याचे दिसतंय त्यामुळे हे भाजप आणि डाव्या पक्षांचा षड्यंत्र असून बंगालमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा हा त्यांचा प्रयत्न असल्याचे आरोप ममता यांच्याकडून करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी सर्व दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश हि ममता यांनी दिले आहेत.
         महिला डॉक्टरच्या हत्येचे प्रकरण अमानुष असून यातील आरोपींसाठी फाशी हि एकमेव शिक्षा असल्याचे ममता यांनी म्हंटले आहे. पिडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः ममता बॅॅनर्जी यांनीही आंदोलन पुकारले आहे. दोषींना पुढच्या रविवार पर्यंत फाशीची शिक्षा देण्यासाठी ममता बॅॅनर्जी यांच्या कडून सीबीआयला हि अल्टीमेट देण्यात आला आहे. दुसरीकडे भाजपच्या महिला आघाडी कडून ममता बॅॅनर्जी यांच्या निवासस्थानावर कॅण्डलमार्च काढण्यात येणार आहे. ममता बॅॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपच्या महिला आघाडी कडून करण्यात येत आहे.
            पिडीतेच्या न्यायासाठी आणि महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आता डॉक्टरांच्या संघटना हि आक्रमक झाल्या आहेत. निवासी डॉक्टरांची संघटना फोर्डाने स्थगित केलेला आपला संप पुन्हा एकदा सुरु केला आहे. सेन्ट्रल प्रोटेक्शन अॅक्टची मागणी फोर्डाकडून करण्यात आली आहे. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशने हि २४ तासांच्या संपाची हाक दिली आहे. १७ ऑगस्ट सकाळी ६ वाजल्यापासून १८ ऑगस्ट सकाळी ६ वाजेपर्यंत आयएमएकडून २४ तासांचा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता ओपीडी आणि इतर सुविधा बंद राहणार आहेत. महाराष्ट्रात हि या घटनेचे पडसात उमटले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता मुंबईतील सर्व निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. नायर हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल, तसेच केईएमच्या डॉक्टरांकडून कोलकतामध्ये घडलेल्या घटनेविरोधात निदर्शने करण्यात आली आहेत. केंद्रीय आणि बीएमसीमार्टचे डॉक्टर हि मंगळवार पासून संपावर गेलेत. पुण्यातल्या ससून मध्ये हि ६०० ते ६५० डॉक्टरांनी संप पुकारला आहे. पुणेस असोसिएशन ऑफ हॉस्पिटल्सने हि या संपाला पाठींबा दिला असून काही हॉस्पिटल्समध्ये संप पुकारण्यात आला आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सुविधा सुरु राहणार असल्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान आपण पर्यायी व्यवस्था उभारली असून रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेत असल्याचे हॉस्पिटल प्रशानाचे म्हणणे आहे.
        या सगळ्या कारणांमुळे कोलकता महिला डॉक्टरच्या हत्त्याचे प्रकरण आता संपूर्ण देशात गाजत आहे. या प्रकारात आणखी काय समोर येणार ? सामुहिक आत्याचाराचा आरोप होत असल्यामुळे यात अजूनही काही लोकांचा हात आहे का ? हे पाहणे आता महत्वाचे असणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes